अहिराणी कविता ....गुलूगुलू म्हनासंगे बोलवं कवी शैलेश चव्हाण
अहिराणी कविता गुलूगुलू म्हनासंगे बोलवं ........ गोरी तुनी मोरनी चालवं थोडं गुलुगुलू मन्हासंगे बोलवं तुनी साडीवर चित्तर मोर तु दखास चंद्रनी कोर तुना गळाम्हा मोतीनी हार थोडी मननी तिजोरी खोलवं तुना कानात हालस डुल पाहीसन जीवना व्हतस हाल तुना गोरा गोरा गुलाबी गाल आयकू दे दाळींबी व्हटना बोलवं तुनी जवानीना चढता पारा पाहीसन मनना फुलस फुलोरा थोड्या पिरीमन्या पडू दे व गारा मन्हा काळीजनी तडफड झेलवं मी सरावन तुन्हावं लाडीना तु हिर्दम्हा इंद्रधनूक पडीना उन पानीना खेळ खेळू घडीना तु नखीत्रनी गुलाबी देनवं गोरी तुनी मोरनी चालवं थोडं गुलुगुलू मन्हासंगे बोलवं शैलेश चव्हाण चिंचावड मालेगाव मन्हा बोल्याआयकू नंबर 9975530308