भारतीय ग्रामीण संस्कृतीदर्शन, ग्रामीण जीवन युद्धाचा आणि नात्यांचा सुंदर गोफ - गल्लीनी भाऊबंदकी
परीक्षण- 1* लेखिका -लतिका चौधरी प्रतिक्रिया-कै. प्रा.किसन पाटील,जळगाव - 16 जून 2016 वाङमयीन लेखनात लेखकाची प्रामाणिक आत्मनिष्ठा प्रविष्ट होत असते. त्याच्या आत्मविष्काराचे प्रकटीकरण ,अभिव्यक्ती आत्मकथनात अधिक असते. 'कथन' करण्यात कथनशैली या मौखिक परंपरेचा संदर्भ असतो. परंतु 'कथन' हे मर्यादित स्वरुपात व्यक्त होण्याचा मार्ग म्हणून स्वीकारले तर त्यामध्ये समोर श्रोतृवर्ग अपेक्षित असतो. त्यापेक्षा तोच अनुभव लिहून ठेवताना 'वक्ता' आणि ' (श्रवणकार) हा एका अर्थी लेखकच असतो त्यामुळे कथनापेक्षा लिहिणे खूप अडचणीचे व जिकरीचे होऊन जाते आपणच आपणास व्यक्त करायचे, चूक की बरोबर ,सत्य-असत्य आणि कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचणार नाही अशा भाषेत ते लिहून काढायचे. त्याला त्रिकालाबाधित सत्याचा अंश म्हणून लेखकास भाषाशैलीतून अविष्कृत करायचे असते. यामध्ये लेखक खूप द्रष्टा, अनुभवी आणि मनाच्या सहाव्या इंद्रियाचा पुरेपूर वापर करणारा असावा लागतो.लेखकाचे वाचन संपन्न असले पाहि...