कसमादेमा दिवाई नी खान्देशनी ऊत्रान!
🍀🪔🍚🍀🪔🍚🍀🪔🍚🍀🪔🍚🍀 *अहिराणींना दसरा,* *कसमादेमा दिवाई नी खान्देशनी ऊत्रान!* ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️ तारीख 22, 23 नी 24 जानेवारी जोडे ई ऱ्हायनी तस *विश्व अहिराणी सम्मेलन वातावरण ऐन थंडीमा बी उबदार व्हई ऱ्हायन. देशोदेशीना अहीर भाऊ बहिणीसना संदेश, निरोप परताया मनले हारीक दि जास! आपली भाषा संस्कृतीनी भूक वाढी ऱ्हायनी. अस्मिता जागृत व्हई ऱ्हायनी. गावेगाव अहिराणीना भोप्या डांगा गुंगाडत वया म्हणी ऱ्हायनात. त्या तालावर अहिराणीना भगत घुमी ऱ्हायनात. बठासले एक आपृक वाटी ऱ्हायन ते म्हणजे दुसरा विश्व अहिराणी संमेलना अध्यक्ष म्हणीसनी डॉ एस के बापूंनी निवड बद्दल कसमादे म्हणजे दक्षिण खान्देशमा ते दिवाई साजरी व्हई ऱ्हायनी. दक्षिण खान्देशना नेता कृषिमंत्री दादा भुसे थेट मालेगावमा ग्यात नी त्यासनी एस के बापुना सत्कार करा. असाच त्यासना नागरी सत्कार दाभाडीमा 19 जानेवारील ...