उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचालितजागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद आयोजित " दुसरे विश्व अहिराणी संमेलन अध्यक्षपदी डॉ.एस के पाटील " तर स्वागताध्यक्षपदी "मा.आमदार मंगेशजी चव्हाण"*
अहिरानी बोली : ( प्रतिनिधी ) उत्तरामहाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचालित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद सन २०२० पासून आपण विश्व अहिरानी संम्मेलन भरवायला सुरवात केली आहे. जेष्ठ अहिरानी लेखक व खान्देशचे इतिहास, संस्कृती, संशोधक बापूसाहेब हटकर यांच्या अध्यक्षतेखाली २०२० मध्ये ऑनलाईन भरविण्यात आलेल्या पहिल्या विश्व अहिरानी संमेलनात भारतासह २७ देशातील अहिर बांधवांनी भाग घेतला होता. त्यात नवे जुने अहिरानी साहित्य, लोकगीत, कथाकथन, कविता, गझल सादर करण्यात आल्या. तसेच खान्देशातील लोककला, संगीत, नृत्य, खाद्य संस्कृतीसह पर्यटन स्थळ, जल, जंगल, जमीन यावर उहापोह करण्यात आला. त्या कान्हदेश आणि कान्हदेश बाहेरील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. या विश्व अहिरानी संमेलनाचे मुख्य फलित म्हणजे २ कोटी अहिराणी भाषिक लोकांच्या या समृद्ध भाषेची भारतीय भाषा विज्ञान भवन बंगलोर आणि युनोस्कोने सर्वात प्रथम दखल घेतली. अहिरानी भाषेला इंडो-आर्यन भाषेचा दर्जा देण्यात आला. तसे पत्र युनोस्कोने संघटनेकडे पाठविले आहे. या कामी भाषा तज्ज्ञ पद्मश्री गणेशदेवी यांचे मार्गदर्...