कानबाई रानबाई नी कन्हेरराजा कोन व्हतात ? - बापूसाहेब हटकर
बापू हटकर 👸🏻🤴🧚🏻♀🤴👸🏻🤴🧚🏻♀🤴👸🏻🤴👸🏻 ! ➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖ कानबाई हाऊ खान्देश म्हणजे बठ्ठा अहिर मुलुख अहिरराष्ट्रना भलता मोठा सन से. कानबाई हाऊ व्हवासना सन से आपला. आखाजी गवराई हाऊ जसा आपल्या आन्ड्रीसना सन से तसा कानबाई हाऊ व्हवासना म्हणजे घरनी लक्ष्मीना सन से. गवराई हाई आंडेर से खान्देशनी संकरजी हाऊ खांदेसना जवाई से. बठी दुन्या म्हनस सत्तरशिंगी मायन मायर खान्देश से. सत्तरशिंगी हाई पारबता से नी तीना गणज नावे सेत. आंबा, जगदंबा, दुर्गा, गिराजा, झनझनी माय(जगत जननी) नी गवराई. हाई गवराई आखाजीले माहेर खान्देशमा येस. आपल्या आन्ड्री बी तवयज मायेरमा येतीस. गवराई बठाडतीस. गाणा म्हंतीस, घाऱ्या र्हान्दु पुऱ्या र्हान्दु येव गवराई जेवाले। गवराई बहीण से मोठी. तिले हाऊ पावनचार. पन संकरजी पावना से तिसना. मंग त्या पावनांनी खेसर करतीस, उंदीर मारू भरीत करू येरे संकर जेवाले।। गवराई हाई आंडेर से. आंडेर आपला घर, य...