अहिरानींनं धन - आखाजी भाग १ ते ३ , लेखन श्री नानाभाऊ माळी, पुणे
अहिरानींनं धन--भाग-०६ वा *।।आखाजी।।--(०१)* *.....नानाभाऊ माळी* भाऊ-बहिणीस्वन! *'आखाजी सारखा सन* *सन तुले टिपरा रवाले!* *आखाजी सारखा सन* *सन तुले झोका खेवाले!* *आखाजी सारखा सन* *उनात तुले संकर लेवाले!'* आखाजीनां!गवराई मायनां!पारबती देवीनां गाना आयीकीस्नि!आपला मनलें! ध्यानलें!चित्तलें.....मव्हरे व्हडत-व्हडत वैशाखम्हा लयी पयेस!...मननां मंग जुना!.. पिव्या-कोल्ला पाचोया गयी जास!नवा... पिव्या-हिरव्या!.. कव्याजरत पाने मननां मुकल्या फांटीस्ले फुटाले लागी जातसं!.....झाडेसन्या फांटीस्नागत मननां वैशाख फुलतं ऱ्हास!निसर्गानं आसचं से!..जथा-तथा चटकेल उनमा भी गुलमोहरनां मायेक धरनी माय हारकी जास!..नयेतरन्या पोरीस्नामायेक!मंग...त्या नयेतरन्या पोरी-बेटी आंबानां मोहरनां मायेक खुलतीस!फुलतीस!माय माहेरनं उमाया जठे-तठे नजरे पडत ऱ्हास!....पोरी!..चार-आठ दिन मव्हरे आखाजी येवानी कानगी देत ऱ्हातीस! भाऊ-बहिणीस्वन! *वैशाखनं नव-नयेतरपन मनलें हुबारी* *देत ऱ्हास!डोयालें* *भुलाळत ऱ...