दुसरे विश्व अहिरानी संमेलन उद्घाटन सोहळा मुंबईत थाटामाटात संपन्न....
यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई, उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद आयोजित दुसरा विश्व अहिराणी संमेलन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालय जवळ मुंबई येथे आज शनिवार दि: २२ जानेवारी,२०२२ रोजी दिमाखदार स्वरुपात आणि थाटामाटात संपन्न झाला पहिल्यांदा अहिराणी भाषेचा उत्सव मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरात झाला. मुंबईमध्ये लोकांना अहिराणी भाषा बोलतांना अभिमान वाटत होता. मुंबईमध्ये आज खूप चांगल्या पद्धतीने सर्व मान्यवरांनी अहिराणीत भाषण करून आहिराणी मायबोलीचा जागर केला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बरच अहिराणी तून बोलले अहिराणी तून शुभेच्छा दिल्या आणि अहिराणी भाषेचा शेड्युल आठ मध्ये समावेश करणेसाठी आणि भाषेविषयीच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करेल असं उपस्थितांना आश्वासित केलं. महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री मा.श्री. गिरीश भाऊ महाजन यांनी सदैव खान्देशसाठी आणि अहिराणी भाषासाठी मी तत्पर आहे. आज जरी माझ्या भागात अहिराणी भाषा न बोलता तावडी भाषा बोलली जात असली त...