पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बोधचिन्हाचा वाद निरर्थक - मा बापूसाहेब हटकर

इमेज
 . 📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻    *अंमळनेर येथे होऊ घातलेल्या,*   *97 व्या मराठी साहित्य संमेलचे,*                   *बोध चिन्ह!*   ➿➿➿➿➿➿➿➿           बऱ्याच वर्षाने खान्देशांत 2, 3, 4 फेब्रुवारी 2024 ला मराठी साहित्य संमेलन होत आहे. गांधी जयंतीचं निमित्त साधून या संमेलनाच बोधचिन्ह प्रकाशित करण्यात आलं आहे. हे बोध चिन्ह प्राचार्य डॉ मिलन भामरे यांनी तयार केलं आहे. अतिशय आशयघन आणि समर्पक असे बोधचिन्ह तयार केल्या बद्दल प्रथम चित्रकार प्राचार्य डॉ मिलन भामरे यांचे अभिनंदन. हे बोधचिन्ह स्वीकारलं म्हणून निवड समितीचे आभार.         या चिन्हतील केळीची पान पाहून काही मंडळींचं पित्त खवळ आणि त्यांनी त्या विरुद्ध रान उठवायला सुरवात केली. त्यांच्या मते केळीचे झाडं हे फक्त सत्यनारायणाच्या पूजेसाठीच लावली जातात. म्हणून त्याचा इतरत्र वापर होत नसावा अशी या टीकाकाराची धारणा असावी. या बोधचिन्हांत नडगी म्हणजे खान्देशी संबळ दाखविली आहे. तिला हे हळदी कुंकवाच्या डब्या समजत आहेत. आणि त्यावरून या बोधचिन्ह...