पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पायत,मेढ्या आणि मुक्सं =============== ——©MKभामरे.बापु

इमेज
  आमच्या मायबोली अहिराणी भाषेतले हे तीन शब्द... पुर्वीच्या काळी ज्वारी बाजरी मळणीसाठी थ्रेशर वगैरे नव्हते. बाजरी ज्वारीची कणसे मळणी साठी गावाबाहेर एक सार्वजनिक वा खाजगी पटांगण असायचे.त्याला खळे म्हणत. उद्या मळणी करायचे असल्यास आज ते शेणामातीने सारवायचे. दुसर्‍या दिवशी त्यावर कणसे पसरवायचे. त्या खळ्यात मधोमध एक लाकडी दांडा गाडलेला असायचा.त्याच्या आजुबाजुला कणसे पसरवुन ४/५/६ बैलांची पायत फिरायची. पायत म्हणजे लाकडी दांड्याला ओळीने बांधलेल्या ४/५/६ बैलांची आडवी रांग. ती सर्व बैले त्या दांड्याभोवती गोलगोल गरगर फिरायचे. त्याने कणसे मोकळे होवुन त्यातुन धान्य अलग व्हायचे. या बैलांमध्ये खुंट्याजवळचा जो बैल असायचा त्याला मेढ्या म्हणायचे.मेढ्या म्हणजे मुख्य. ह्या मेढ्याला पायी चालनं कमी दिसायचं व ५ व्या ६ व्या बैलाला मात्र मोठा राउंड चालावे लागे. या बैलांनी कणसं खाऊ नये म्हणुन नारळदोरीने गुंफलेले  मास्क्स तोंडाला बांधलेले असायचे.त्याला मुक्सं म्हणायचे. यातल्या मेढ्याची अवस्था मोठी बिकट. पाहणार्‍याला वाटते की त्याला कमी चालावे लागते. पण त्याला जवळ जवळ स्वतःभोवतीच गोल गोल फिरावे लागते, तेथ...

भारत खंडाचा शेवटचा आदर्श राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड

इमेज
  आज श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची १५७ वी जयंती, महाराजांचे मुळ नाव गोपाळ काशीराम गायकवाड, महाराजांचा जन्म ११ मार्च १८ ६३ रोजी कौळाणे ता मालेगाव जि नाशिक खान्देशात झाला, वयाच्या अकराव्या वर्षा प्रर्यत गोपाळ गुराखी होता व वयाच्या १२ व्या वर्षी बडोद्यात महाराज खंडेराव गायकवाड यांना दत्तक गेले.  दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजीराव महाराज यांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३),. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या,. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); पंचायत राज व्यवस्था, तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच...