खान्देश ना भालदेव
खान्देसना भालदेव . बायजा झापाटामाच मोठमाय कडे ' गई नी भाहीरथीनच हाका माराले लागनी " मोठमाय .. वं ss मोठमाय ... " आनखीन मोठाईन हाका मारस. " मोठमा ss य ... आयया माय ...कथा ग्यात व्हतीन. या घरम्हातल्या बाया ? दखना कव्व्यसनी येडीना मायेक हाका मारी राहयनू ' कोनीच कसा व्हकारा देत नई .. ? " तवसामा ते मोठमाय दारलोंग ई लागनी व्हती . " वं ss कोन शे ' .. कोन बायजा ? आयाय माय एव्हढा झापाटामा काय काम काढ् वं माय ? " काय काम काढु ? ...