खान्देश ना भालदेव
खान्देसना भालदेव .
बायजा झापाटामाच मोठमाय कडे ' गई नी भाहीरथीनच हाका माराले लागनी " मोठमाय .. वं ss मोठमाय ... " आनखीन मोठाईन हाका मारस.
" मोठमा ss य ... आयया माय ...कथा ग्यात व्हतीन. या घरम्हातल्या बाया ? दखना कव्व्यसनी येडीना मायेक हाका मारी राहयनू ' कोनीच कसा व्हकारा देत नई .. ? " तवसामा ते मोठमाय दारलोंग ई लागनी व्हती .
" वं ss कोन शे ' .. कोन बायजा ? आयाय माय एव्हढा झापाटामा काय काम काढ् वं माय ? " काय काम काढु ? " अन् काय शे तुना हातमा बायजा .. ? " " मोठमाय ... ताक लेवाले उन्थू ... हातमा हाई धाकली बगुनी व्हती . ! "
' काय बोलनी .. ताक ? वं माय वं ..! "
" काय झाये आत्या तुले चमकाले . . ? " नई काये शे . . . " " झापाटामा तं रही नी ताक घुसायाना आवाज ई राह्यंता " . " वं ss बायजा ' तुनी गोट खरी शे ' .. पन गंम्मत काय शे . . . वं आमना घर कानी भालदेव बशेल शे म्हंत .. आते तं दुध बी देता येवाव नई नी ताक बी देता येवाव नई ' अशी गोट व्हई गई ... काय करस माय ? "
" माय वं ' आठे तं न्यारच ऐकाले भेटी राहयनं . " " काय करस बईन ' तुले तं माहित शे ' दख आमना घर गाई ' म्हशीसना कव्हढा मैझारा ऱ्हास तो ?
" हा ना मोठ माय . ! "
" वं आते आमले सात दिन दुध काय नी ताक काय काई म्हंता काईच देता येवाव नई ... या दारना भाहिर बी कोनले लई जाता येवाव नई .. " " वं मायवं ' हाई तं मंग तक उपादच व्हई गई ना मंग . । " " काय करस बईन ' वं माय भालदेवना या असाच नेम ऱ्हातस ' काय करस आते ' बोल . . ! "
मंडई ' बायजा बिचारी साधी भोयी पोर व्हती .. तिले या बारा परेडी काय माहित व्हत्यात ? पन मंडई ती मातर वट्टावरच बशी गयी बरं । " आनी मोट माय काय सांगस ते कान दीसन ऐकाले लागनी ..... पन मंडई ' ती बायजा व्हती गप बसनारा पोरीसमा नई व्हती . तिनी मोठमायले ईचारीच टाक् . " मोठमाय ' एक गोट ईचारू का ? " " ईचारना बायजा ईचार ! " " मंग आमना घर भी भालदेव बसाडता ई का ? '
" वं ss नई वं येडी ' तसं नई ऱ्हास हाई ' वं ज्याना घर गायी म्हशी दुभदुभता जनावरे ऱ्हातस त्यासनाच घर भालदेव बसाडतस . " " वं माय वं ' अशी बी गोट शे कां ? " " हं ss ' असच ऱ्हास बईन ' काय करस माय .. ? " पन मंग मोठमाय कसं काय करस पडस ते ? " " वं कशी गंम्मत शे घरमातला केर कचरा झाडीसन दारना मांगे लाई देना पडस मंग तो केर कचरा एक ठिकाने कोपरावर लाई देवो . सात दिनना कचरा पुंजा भाहीर जाऊ देना नई पडत . . तठेच रोज लाई देना पडस बरं ' | ' " व माय वं . ! " ' मंग नदी म्हाईन जाड जाड चिकना बारीक दगडे ' नदीम्हातली वावू ' .. आनी बईनले सांगू नदी ना किनारे त्या हिरव्या लव्हाई उगतीस ना .. ? " हां त्या . ? " " त्या बी उपटी आनान्या ... " माय वं त्या लव्हाई पन ? " मंग वं पोरी ' त्या लव्हाई घर आनीसन त्या दारना आड कचरा ' शेन ' नदीनी वावू ' गोट्या गार गोट्या त्यासमा त्या लव्हाई खोची देन्या पडतीस . " " वं माय वं " " मंग वं बईन ' आनी पुढे ते गंमत दख ' त्या पूंजानी हयद ' कुकू लाईसन रोज पुंजा करनी पडस .. गहूना पीठना दिवा नी जोत लावनी पडस .. "
" वं माय मोठमाय .. । " " मंग वं बईन कवढा मैझारा ऱ्हास हाऊ .. काय करस वं माय ..! '
" मंग ..! "
" त्यानावर घोंगडीनं तुकड् बी ठेवनं पडस .. " " माय माय माय ..! " " सात दिन भालदेव उठासिवाय घर म्हातलं दुध ' तूप ' ताक काई काईच भाहीर जाऊ देनं नई पडस . " ..
" मोठमाय काय कडक नेम शेत वं माय .. ? " " काय करस बईन ' आपला वाड वडिलेसनीच लाईल ठेल शेत त्या नेम ' ते आपुनबी काय करसूत ? " खरी गोट शे मोठमाय . पन मी काय म्हनस ' हाऊ भालदेव म्हंजी कोनता देव ऱ्हास ? " गनपती बाप्पा नं नाव भालचंद्र से ' मंग हाऊ गनपती बाप्पा म्हंजी भालदेव शे . आपला खान्देसना भालदेव ! " " अशी गोट शे का ? " " वं हाई कथा पोथी पुरानमा बी शे म्हने . " " अस्स . . ! "
" एकदा काय झाये म्हने ' आपला महादेवनी पार्वती शे ना ' तिले म्हमे एकदा आंग धोवानं ऱ्हास .. ती ईचार कराले लागनी आपनते आंग धोसूत . . आपला घरले कुष्टाये नई . कोनी बी ई जाई .. मंग आठे कोनले तरी बसाडनं पडी .. ती इचार मा पडनी आनी मंग तिनी काय कये ' आपला आंगना ' ' मय " काढा नी त्याना पुतया बनाडा नी त्यामा जीव वता . " " वं माय वं . ! "
" तू ऐक ते खरी .. "
"तिनी त्यामा जीव वता ' आनी तो म्हंजी आपला गनपती बाप्पा .. भालदेव .. ! " " ओ माय वं .. " । " आपला खान्देसना भासदेव..! " पन मंग तिनी आंग धवाले जावाना पह्यले भालदेवले बजाडी दिनं " दख भाऊ ' मी जास आते आंग धवाले ' तुले आठे पहारा कराले बसाडी जास . तु मातर कोनले . येऊ देऊ नको नी कोनले लिवू बी नको " . "म्हंजी मोट माय पार्वती मायनी एक परकारे हाऊ पहारेकरीच बसाडी दिथां ना ? " कशी बोलनी ? " " मंग ' हाऊच भालदेव ' अशीच ना ? " " मंग वं माय ' काय करस ' अशी गोट शे " . " मोठमाय ' तुमीन बाकी भलत्या हुश्शार बरं । "
" वं माय ' तो देवदास भाऊ नई का ' हटकर बापु म्हंतस त्यासले त्यासनीच हाई गम्मत जमाडी आनी " . भलता न्यामी शे तो मानूस ! " " माय वं .. दख दिवस उजाडी गया .. एस मंग मोठ माय . " " ये वं बईन ये ss ' सम्हाईसन जाय बरं . . ! "
तर मंडई आपला खान्देसना भालदेव नी हाई माहिती आपला जुना रिती रिवाज कसा व्हतात ते या संवाद द्वारे मांडाना मी प्रयत्न कया ...
आते मंडई कोनी पायस कोनी नई पायस .. नवा जमाना .. नव्या चालिरिती ... काय करतस ? एस मंग ..! राम ... राम ' !!! * विश्राम बिरारी ' धुळे 9552074343 . ...................................... : ...........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा