खान्देश न्या जुन्या रिती-भाती
*खानदेशन्या रिती-भाती*
*फुनक मिरावानं* कुवारी,कुवारा नवरदेव नवरीले, हायद लावा नंतर सरा गावमां घोडावर बसाडीसन मिरवणूक काडतस. नवरीले पो-याना कपडा घालीस मिरावानं. लोक नाचत कुदत शामिल व्हातस. हाई फूनक बराच दा फुई काढस म्हनजे या इधीना खर्च नवरी नवरदेवनी फुई करस. म्हणीसन त्याले फूनक म्हणतेस.
फुईनी के ते फूनक हाऊ आरथ से.
*मांडो टाकानं*.....लगीना येक दिन आदोगर बैलगाड जुपीसन वावरातू उंबर, जाभुई, आंबान्या, फांट्या आनीस भावकीना घर नी लगीन घरना धबावर, नी मंडप वर टाकानं तो मांडो/मांडव.
*हायद फोडानी*..पाच सवासनी मियीस गाना म्हनतीस बाय हायद घी फोडानी मगं घट्यावर दयानी.
*आवतनं/निवत देवानं*
चुल्हाले निवत-खूप मालदार माणूस व्हई ते तो गावमा चुलाले निवत देस म्हनजे अख्ख गाव स-या जाती गोर गरीब, रांडी, मुंडी हारेक घरले निवत. त्यारोज गावमा चुल्हा चेटस नहीं म्हनीसन ते चुल्हाले निवत. भाऊ बनकी की ते लगीन सरस तव लोंग रोज दोन्ही टेम जेवन.
*सडा माणुसले निवत*
मानोस घरना जराख गरीब व्हई ते गावमा घर परात फक्त येक सडा मानोसले निवत देतस.
या निवता देवाना कामे गावना गव्हाईना न्हाई करस
*टायी लावानं* टाई हाऊ लगीनना महोतना सोबन{समारंभ}नवरा नवरी येरनयेरना गयाम्हा फुलेस्ना हार घालतस,बाम्हन आस्टक म्हनस लगिन लागस.
*मुंदी वाजाडानं,आहेर करनं*.....आपूनवाली मनसा परमाने पैसा,भांडा,कपडा,जोड आहेर लगिन्हान देवानं,वाजाडान.
*परनाले जानं*.....नवरदेव पूरी जान व-हाड लिसन नवरीना गावले जास त्याले परनाले जान.
*परननं*-नवरी जिकी लै जान.
*उचली नवरी*.....नवरदेवना घर नवरी हायदना एक रोज पयल्हे जास. लगीन व्हस तव तिठेच ऱ्हास.
*तेलन पाडानं*....हायद लायीस रातले नवरदेव,नवरी यास्ना डोकावर पित्तयनी वाटीम्हा तेल तुयशीनी काडी त्याले वात गुंडायेले,गायनीम्हा देव टाकीस, घट्यावर, उखडावर, दारनवर,चुल्हावर,उख्खयवर,हेरवर पाच सवासनी मियीस गाना म्हनत जावान.
*देव नाचाडानं*.....घरातला नी भावकिनी खंडेराव नी देवस्नी माय घीस नवरदेव नवरीना डोकावर, भावबंधकीन्या बायास्नी लाल फडकामा टाकीस डोकावर धरी नाचीस गाना म्हनानात.
*फोकानं*.....हायदना कच्चा सुतना दोराले सात वाव घीस काकन ना मायेक बनायीस,आड नी उभ नवरदेव नवरी ना डोकाले पाच देव लायीस गाना म्हनत फोकान.
*सायकड*.....लगीन रोज नवरीले घी जावन सामायीन.
*कुकू टिया करनं*....पसंन करीस लगीनले तयारी करवो यालेज आते साखर पुडा म्हणतस.
*सोपारी फोडानं*.....लगीन पक्कं व्हयन असे समजवो.
*उष्टी हायद*.....पो-यांना आंगले लायेल उरावानी मंग ती नवरीले देवानी.
*साखरपुडा*.....हायद कुकू,साड्या,लच्छ्या,फये,गोड धोड,मुंदी बाकी सामायीन,नवरदेव नवरीसाठी देन पडस.
*चिरामुंदी*...लगीन पक्कं व्हयी गय अशे समजतस. हाऊ बी साखर पुडाना भाग से
*कानबाईना थाट भरानं*.....लगीन तीनं चार दिन आदोगर तांदुय, दुध, केसर,काजू,बदाम,साखर टाकीस मोहन भात बनावाना मंग तो भात आरती करीस फक्त येकच कुटमाना लोकस्नी खावाना म्हनजे फक्त शेवाळे आडनाव वालास्नीज खावाना.
*मोठ मुय*.....काही लोके लगीनमा देतस,ते काही लगीन व्हवावर देतस.यावात पोरले चास्टी,खुरपी, भोगन..काय जे सौसारले लागस त्या समदा डिबरा देना पडतस.गादी,पलंग कपाट समदज देन पडस.
*मांडो टिपानं*....लगीन व्हवावर नवरदेव नी माय पयल्ही दाव व्हवू ना माहेर,याही ना घर जास.
*चुल्ह फुकानं*.....लगीन व्हवावर नवरी नी माय पयल्ही दाव जवाई ना घर,याहीना घर जास.
*पय्हल मुय*.....लगीन व्हवानंतर व्हवू लाडू,पुडा सरा गावले वाटाले आनस.
*सुन मुख पाव्हानं*....लगीन व्हवावर काही पै पाव्हना व्हवूना हातम्हान काहीतरी जिन्नस देतस,यावात पैसा येखादी वस्तूक सवाय तोंड पात न्हैत.
*जानस घर*....नवरदेवन वऱ्हाड जिठे उतरेल ऱ्हास ते घर.
*टायी लावानं*-पयल्हे गोरज मुहूर्त वर लगने लागेत. सूर्ये बुडावर लग्न लागे. ब्राम्हन उच्चा घरवर उभा ऱ्हाइसन मंगल आष्टके म्हने. सूर्ये बुडाले लागना की मंग तो दोन्ही हात उच्चा करी वजेवजे नजिक ल्हये. सूर्ये बुडताज हातावर हात मारी टायी वाजे नी त्याच येयले लगन लागे त्यागुन्ता वरथुन टायी हाऊ सबुद सुरू जया.
*बिद मिरावानं:-* लगीन व्हयन का नवरदेव नवरीले त्याना घर घी जास मंग रातले,बैलगाड,टांग,बग्गी सजाडीस त्यावर वाजतगाजत मिरोनूक काढतस.कंदील,बत्त्या डोकावर धरीसन उजाय पाडतो.
*शिराईन लगीनं:-* नवी शिराई,झाडणी आनी का तिरोज तिन्ही पुंजा करानी मंग खांबना भवते तिले घीस फेरी मारानी.
*खोय भरानं*.....व्हवूले दिन गय त का मंग साती महिनाले खोय भरतस.
*साखर पानं वाटानं*..भासा,भाशी व्हयन ते आत्या न्हायीले सांगीस सरा गावले साखर पानं खुशीना वाटस.
*ववा,वाट्या,बायतोडा घेवानं*..बायातीन बाईले ववा, वाट्या, खारीक, खोबर, साडी, बायतोडा, सर घी जान पडस.
*घुगरावनं*....धाकला लेकरूले आयामावल्यास्प घि जान. हरभरा नि गहू शिजाडीस, नारय फोडीस पूंजा करीस परसाद वाटांना.
*मम्हार उलटावनं, दुध पलटावनं*.. बायातीनले सासरथी काही दिनमां माहेर धाडानं.
*गोंधय,आढी जागर*....लगीन व्हवावर खंडेरावले निवत दिस वाघ्या मुरया,दिवट्या बुधल्या करान्या,पाच जीव मारतीस सरा गावले जेव्हाडान.भावकीम्हान बाजरी वाटतस,समदा ती बाजरी दयी आनतस. भाकरी रांधीस गोंधयना घरले घी जातस. तिठे खाटलावर भाकरी रचतस.
*आखत घेवानं*.....उमरटले गायना गोमतीर वरी सारान. पूंजा करानी, येक पो-याले दारनं वलांडाले लावतस.
*खंडेरावनी तयी*....कोन्ताबी आयतवार, न्है ते नवरातनी साती माये, वांगे सट ले भरानी.पांच मानस टोपी घालेल लागतस. देवस्नी माय,कांबय,खोबरानी वाटी,तांबान ताट, तांब्या, हायद{भंडारा} लागस
*धोंड्या*....पानी न्है पडस तधय धाकला पो-याना डोकावर निमना पालानी टोपी, कमर गयामा लिमना पाला बांधन त्याना आंगवर पानी टाकीस त्याले सरा गावात मिरावन,धोंड्या धोंड्या पानी दे म्हानान.
*भावाडा, लयीद*....भादाना महिनामा गावातला लोक मिळीस पुर रामायन करान हे चांगल पुरी रात भर चालस.बट्ठास्ना घर पै पाव्हना येल -हातस भावडा, लळीद पाव्हाले.सायसुंगीत बट्ठा पातर बनतस.
*गौराई न पानी आनान..* गौराई बठाडी का तांबाना तांब्याम्हान डोकावर चोंभय ठिस -हेरवर पानी आनन पडस.
*बार रवानं*.....आखाजीले गवरायी उठाडीस दोन गावन्या पोरी नदीथडे जमतीस आन् येरनयेरले गाया दी स सरी खुमखुमी काढी घेतीस. दोन गावना शिव वर झगडा करतीस.आननम्हा करतस दुशीरोज समद इसरी जातस.
*गुलाबाई माडांनी....* भादानी पुनीले गुलाबाई संकर पारबतीना रूपम्हा बसतस.महिनाबर पोरी तिले सयसांजे गाना म्हनीस थंडी करतीस.खावू वयखीस आरती करतीस.आश्विन महिनानी कोजागिरी पुनीले जागरन करतीस मंग नद्यात टाकतीस.
*तुयशीन लगीनं खोपडी एकादस*....कार्तिक महिनामा हायी लगीन लागस, तव्हय पाही बाकीना लग्ने सुरू व्हतस.
*गाय गि-हास:-* कोनतबी सन,पितोर आखो काय बी-हावो गायना घास आधी काढी येकादस ठेवो,तिले खावाडो.
*पारन फेडानं:-* एकादशीना दुशी रोज दुवादशीले आखो कोनता बी उप्पास -हावो तो सोडाले बसो,जेवाले बसो,उपास सोडो.
*रोट कराना*.....गहू ना रोट बनाईस, रान गवरीस्मा भुंजान, कानबाईले निवत देवान,मगं उपास सोडाना.
*मानता फेडानं*....कोनताबी देवले, देवीले नवस बोलेल -हास तो त्या जागे जाईस,चोखा,{गोड} न्हैते तिखा{मटनना}देवान मानता फेडी जी स घर येवो.
*जावये काढानं*....येखादा देव, देवी प जाईस आत्यानी मांडीवर भासा,भाशी बसाडान नी न्हायी घायी डोका व-हला बाले काढान. नवा कपडा लत्ता घेवान.
*घरभरनी*....नव घर बांधीस त्या घरात जावाना आदोगर घर नी शांती करानी,लोके जेव्हाडो,उष्ट पाडो, सत्यनारायण करो परसाद वाटो.
*मुंज्या बसाडो*.....कुवा-या जर देवघर गया ते त्यान्हा झाड खाल दगडना मुरती बनाडीस मुंज्या बसाडतस.
*पो-याले खोयमा देवानं:-* व्हयेल पोरग वाचाले पायजे म्हनी कोनी बी खोयमा टाकन पडस, मंग पोरे वाचस, दगड्या, धोंड्या, भिल्या नावे ठेवो.
*चिरा बसाडो*....घरातला मोठ मानूस देवघर गया ते त्यान्हा दगडना चिरा बसाडतस.
*फाग मांगानं*.....व्हयी ना येयेस आदीवासी लोके, रिसडी, सुपली बाई,संकर बनाडस कसान बी रूप घी स घरोघर नाचीस दाना मांगतस त्याले फाग मांगान म्हनतस.
*डोंग-या देव*.....आदिवाशी लोकेस्ना देवले म्हनतस,भारी पुंजा करतस त्या लोके बी.
*सकून पाव्हनं*....सुपड सरय धरिस मनातलं बोलो मंग ते सुपड हालस तवय म्हनतस की ते खर व्हत का खोट व्हत.
*डेरगं भरानं*....घरातल कोनी गमन का आकरा महिना त्यास्न डेरगं भरतस. पहिली आखजिले डेरग भरतस.
*वाटे लावानं*.....कोनी गमी गय का म्हसनखायी पावत सरास्ना संगे पिरेत पोसाडान.
*सुकडी वाटानं:-* वयस्कर माणूस मरणा ते पिरेत बयन का तिठे जेवढा लोकं -हातस त्यास्ले चिवडा नी बर्फी वाटतस त्याले सुगडी म्हनतस.
*उष्टा तोंडे करानं:-* कोनी गमन का त्याले वाटे लायीस येयेल लोकेस्ले जेव्हाडन पडस.
*दुख देवानं:-* घरातल कोनी गमावर मोठी व्हवू,बहिन,आंडेर यासम्हायीन कोनी बी एक ले दुख देतस, तिनी पाच रोज कायीज न्है करो,कोनी वन का तधय तोंड झाकीस रडान.
*पानी देत्या:-* सरनले जो आगीन लावस,जो मडक धरतो तो पानी देत्या.
*महिनाना पितोर:-* कोनी गमन का ति तिथले दर महिनाले,पितोर न्हैते पिसरीन जेवाडतस.
*बारवर जानं*...कोन्ही गमी गय का तिठे सव्वा महिनामा तिठेन्या बाई बाप्यास्ले बोलाले जान पडस.
*तोंड झाकान:-* कोन्ही गमावर बाया बोलाले,दारवर जातीस तदय दुख देल बाई तोंड झाकीस रडस.
*दुध टाकाले*.....घराम्हातल जवय कोनी गमन का ती बाईले दुख इसरा करता दुसरीबाक घी जान पडस.
*पितोर,पितरी बसाडानं, सवाशीन*..गमेल बाई,मानूस ले जेवाडो यास्नी घास टाका शिवाय कोनी खावो न्है.
*कुयीक उतारानं :-* एखादा धाकलसा पोर पो-याले कोन्ही टोक ते त्याले दिट लागनी,नजर लागनी ते तधळ कुयीक उतारानी म्हनतस.
*सटी पुंजानी:-* बायातीन व्हावर पोच रोजमा त्या पोर,पो-याना आर बोर आनिस,पाच सवासनी,हारबराना पालानी भाजी बोरं टाकी करतस,एक पाटलं मांडेल -हार त्यावर व्हयी, पेन,दऊत ठेवतस,रातले सटीमाय येस नी काहीतरी लिव्हस.
*सासू उतारानी:-* लगीन व्हवावर पोरं पहिली दाव माहेर वनी का तिले न्हावाडी,धुवाडीस सासरन्याज बाता करी -हावान.
*खंडेरावले कोटम भरानं:-* खंडेरावना मंदिरात जाईस वाडवडीलना नावले जागर घालवा,वाघ्या मुरयी नाचाडानं.
*अढी जागर घालानं:-* खंडेरावना पुढे जागरन करानं.
*लंगर तोडानं:-* खंडेरावना पुढे येक लोखंडनी कडी घेवानी मंग ती येकज झटकामां तोडीस ती तुटेल कडीन तुकड घरना देवघरात ठेवान.
*देवीना चकरे भरानं:-* नवरातमा साती मायले देवीना,घटना पुढे चकर भरतस.
*मोथीर लाव्न:-* रांडकी व्हवावर बी एखादासावा तिन्ह दुसर लगीन करतस जरास न्यारी रीत -हास ती त्याले मोथीर,मवथीर म्हनतस.
*कानबाईखाल लगीन लावानं :-* कोन्ही मानता मानेल व्हयीते कानबाईना जोगे लगीन लावतस.
कानबाई खाल लगीन लावणं, म्हनजे ज्या घरमा बारा बी महिना कानबाई बठेल ऱ्हास त्या घर जाई लग्न लावन. हाई घर पूरा आंबाना लाकडेसन ऱ्हास. या लगन करता कोनताज महुरथ का बाम्हन लागस नै.
संकलन काशीकन्या {जालना}
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा