पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन गिरडन अहिराणी साहित्य संमेलन दांगडो २

इमेज
 **  बबल्या मन्हावर डेडोर सारखा फुगेल व्हता. मारक्या बैल सारखा मन्हा कडे डोया वटारीसन दखी ह्रायंन्ता... इकडे बठ्ठा मानपान ना पाव्हणा कवतीक वट्टावर बशेल व्हतात. आते पाव्हणा पुयीस्ले पुकारान काम गोफनेसर, इना बागूल ह्या पह्रेडकर करी ह्रायतांत. बबल्या मस्त खुर्चीवर टेकीसन बशेल व्हता. वट्टावर बशेल पाव्हणास्ना कडे बारीक नजर करीसन बबल्यानी पारख चालु व्हती. शायना मालक मा परताप नानाभु, मराठी सब्दसाटाना भाट मा परसांत दादा, संमेलन ना मेढ्या सातपुडाना पहाडी आवाज मा परसांत दादा मोरे, अहिरानी ना जाणता जागता इतिहास मा हटकर बाप्पा, मा विकास भु, आते अम्मयनेर ना साहित्य संमेलन ना निवतकार मा जोशी सर.... आम्हनी आक्का, डाकटर सदा भु... आसा बठ्ठा आफलातुरस्ना वट्टा गच्च भरेल व्हता. फुलेस्ना डस्का दिसन बठ्ठास्न कवतीक चालु व्हत... पण बबल्यानी इतला राग येलवर बी मन्हा कवतीकना येले जोरबन टाया टीप्यात...            तसा हाऊ कवतीक ना बठ्ठा कार्यक्रम कुयीक लागा सारखा व्हता... म्हणीसन बबल्या ले मी खाजीसन रंगत काढ... "बबल्या बय कुयीक लागा सारखा कार्यक्रम शे... काया करदोडा कोणले बां...

आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन कालदिस्न गिरडन अहिराणी साहित्य संमेलन

इमेज
 ** आज बबल्या गयरा फाममा व्हता. चस्मा पुसेल पासेल व्हता, पण उलटाच घालेल व्हता, चस्मा नी दोरी गयमा लोमकेल व्हती, माल्हे दखताच जोरमा आराई मारी बबल्या नी, "नानाभु! ओ नानाभु!!," काय रे भो बबल्या, आज कथा चुकायना भो,"……?" आरे नानाभु हायी काही इचारन झाय का बर? कालदीन भडगाव ले हलवाई दुकान मा जिलंबी कुमाचडी ह्रांयनंतु, बय नानाभु, लोक बी साल गयरा वातरेल शेत, तो माणूस माल्हे तो आप्ला मामलेदार नही का? अम्मयनेरना....! मी बोलणु" आरे हा, त्या सुदाम महाजन का रे?" "हा बरोबर तसाच दिशेत" बबल्या बोलणा, तो माणूस बोलणा म्हणे हायी चाकुयी लेरे भो, आप्ला बापु ले आंडेर व्हयनी,... हां... बय आते आप्ला तीन बापु शेत, पुणाना, मुंबई ना, नी शिरपूर ना...जिलंबी लिदी नानाभु! पण ह्या तीन बापुस्मा कोणता कलाकार बापु व्हयीन भो?" मन्ह काही डोकस चालन नही, पण हारीक मा, ती चाकुयी खायीसन, आजुन छटागबर जिलंबी लिन्ही खात बसनु. दख ते मी ठगायी जायेल व्हतु, त्या हाटेल ना कारागीर न नाव बापु व्हत. तो आप्ला मामलेदार बी नही व्हता, जिलंबी तयनारा निंघना तो जुवान. मायन्यान भो पयलसावा 30 रुप्यानी ठो...

बैल पोया! शिवाजीराव साळूंके चाळीसगाव

**---- मी मांघना आठोडाफाईन इच्यारम्हा पडी जायेल व्हतू! माले म्हाईत शे तुमीन याव्हर माले काय ईच्यारशात ते! म्हनीसन पह्यलेन पह्यले मीच तुम्हले सांगी देस! ते भावड्यासहोन मन्हा मनम्हा आसा ईच्यार टपल्या मारी र्हायन्था का धुये, कापडनं, सोनगीर, पातोंडं, शिरुर, आम्मयनेर, पिंगयवाडं, तांदई, गिरड, आनोर्द, बुधगाव, पाचोरा, शिरपूर, आरथं, नांद्डं, बोराडी, वाडी-वघाडी, बायदं-जातोडं, वरुय-भटानं, बाम्हनं  धमानं, ईख्रन, ईखूर्लं, आन तथा पार शाहादा-नंदुरबारना आंगेपांगेना गाये करत करत पार मालेगाव, लासलगाव आन बागलान लगून भिडी गवू,  काही च्याईस्गावना वर्ला हेटला मेहुनबारं, धामनगाव, तिर्फयं, धाक्लं वर्खडं मोठं वर्खडं, मधम्हानं ते पयासरं, खडकी, चिंचगव्हान, टाकळी, भडगाव, नगरदेवळं, आसा आंगेपांगेना पाचपन्नास गायेसले फेरफटका मारीसन ईवूत म्हन्तं.  हात तिन्ही बैझू तुमीन दिन्हना माले आखो बिचकाडी! म्हने हाई फेरफटका मारानं भूत शे का चुर्हेड शे का हाडळ शे का ती हाबाडाखीन शे या नेमका आप्ला शिवाजीआप्पाना खुयचट डोकाम्हानंच कसकाय उठबश्या मारी र्हायनात व्हतीन? आते जराखं डोकं थंडं ठीसनी आयकशात का नई तुमीन! आयका आत...