आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी
:
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
अत्तर क्षणस्ना सुगंध / प्रा.बी.एन.चौधरी / ९४२३४९२५९३.
समाजम्हा काही मानसं फक्त स्वतःसाठे जगतस. काही मानसं ह्या आपला कुटुंबकबिलापुरतं जगतस. काही मानसं ह्या घरदार सोडिसन विरक्त व्हतंस, संन्यासी व्हई जातंस तर काही मानसं ह्या समाजना व्हईसन समाजसाठे जगतंस. स्वतःसाठे, कुटुंबसाठे किडा, मुंग्याबी जगतंस. विरक्त व्हईसन अनेक साधू पुरुष वनवन जगभर फिरतंस. त्यासाठे गहिरं काही करनं पडत नही. मातर, घर नेमबंद पध्दतथून समाईसन, समाजसाठे जगाले खूप काही करनं पडस. इमानदारी, सचोटी, काटकसर, त्याग, कष्ट, सातत्य आणि समर्पण यास्ना सुयोग्य मे जमस, तव्हय एखादाना हातून, समाजोध्दारनं कार्य घडी येस. खान्देशना सुपूत्र आणि मराठवाडाना कर्मयोगी, चाळीसगावना ३ रं अखिल भारतीय आहिराणी साहित्य संमेलनना संमेलनाध्यक्ष डॉ. रमेश सूर्यवंशी, ह्या असाच एक भाषा आभ्यासक आनी समाजसेवक शेतस. त्यास्नी आपला मातृभूमीनं, मायबोलीनं ऋण फेडासाठे, आहिराणी बोलीम्हा संशोधन करीसन, एकदम महत्वानी अशी ग्रंथसंपदा निर्माण करेल शे. त्यास्ना आहिराणी शब्दकोश, आहिराणी म्हणी आनी वाक्प्रचार तसंच खान्देशनं सचित्र कृषक जनजीवन ह्या ग्रंथ म्हनजे खान्देशना सांस्कृतिक ठेवाच शे. जोडुनिया धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेच करी ! असं संत तुकाराम महाराज म्हनतंस. सन्मार्गाथून धन जमाडीसन, त्यान्हा व्यवहारम्हा उत्तम उपयोग कराले जोयजे. विचारस्मा परिपक्वता आनीसन, जीवन व्यतीत कराले जोयजे. या उक्तीवर डॉ. सूर्यवंशी यास्नं जगनं बेतेल शे. असा हाऊ समाजप्रबोधक, मन्हा लोकसंख्या विस्फोट व्यंगचित्रात्मक प्रदर्शनना निमित्ताथून मन्हाशे जुयना. मन्हा शब्दमित्र झाया. त्यास्नी साधना, संशोधनना बये त्या कधी मन्हा गुरु व्हयीगयात, ते माल्हेबी कयनं नही. नुकताच त्यास्ना हस्ते माल्हे वापीम्हा (गुजरात), आहिराणी भाषांना, मन्हा योगदानाबद्दल "खान्देश भूषण" पुरस्कार बहाल करायना. तो मन्हा जीवनम्हातला एक अत्तर क्षण बनी गया. आपलं अवघं आयुष्य ज्या मानुसनी आहिराणी बोलीनं संशोधनम्हा घालं, त्यास्नाज हस्ते आपला गौरव व्हनं, याहून मोठा गौरव आनी आनंद नही. हाऊ आनंद ज्यांस्नी माले दिन्हा त्या सौ. सुनिताताई पाटील (नाशिक) आणि संग्रामसिंह राणा (वापी) यास्ना ऋणाईत राहसू. वापीना हाऊ अत्तर क्षण, मन्हं उरेल आयुष्य सुगंधी करी टाकाले पुरेसा शे. हाऊ क्षन डॉ. सूर्यवंशी आनी मन्हा नाताले एक नवी चमक दी गया. त्यास्ना कार्याना हाऊ शब्दवेध शे.
९० ना दशकम्हा, मी स्वतः लोकसंख्या शिक्षणनाकार्याले वाही लेयेल व्हतं. मन्हा या व्यंगचित्र प्रदर्शननी माहिती, सामाजिक कार्याम्हा अग्रेसर असा सूर्यवंशी यास्ले समजनी. त्यास्नी त्यास्ना कन्नडना महाविद्यालयम्हा प्रदर्शनासाठे माले आमंत्रित करं. मी आनंदथून त्यास्नं निमंत्रन स्विकारं. प्रदर्शन भराडं. विद्यार्थ्यी, शिक्षक आनी ग्रामस्थस्नी उत्स्फूर्त सहभाग नोंदा. प्रदर्शन कमालनं यशस्वी झायं. सरस्नी एक कार्यक्रम लिसन मन्हा उचित सत्कार करा. घर आग्रहाथून पाहुनचार करा. वयख ना पायख, तरी आम्ही आम्हना सामाजिक कार्यामुळे एकत्र उनूत. आपली आवड निवड परमाने आपला मित्रस्ना गोतावळा जमस, असं म्हनतंस. तसा आम्ही जुळनूत. मित्र बननूत. आपलं काम करत असतांना, समाजनं आपण देनं लागतस. समाजासाठेबी काही कराले जोयजे. हाऊ विचार आम्हना नाताना बंध झाया. तो पुढे दृढ व्हत गया. जो आजतागायत जुळेल शे.
सूर्यवंशी सरस्नी आपला स्वभावनुसार पुढे स्वतःले, खान्देशी संस्कृती आणि बोली भाषा याम्हा गुताडी लिन्हं. एकदा मी आखाजी निमित्ताथून आम्हना घर व्हयेल पूजानं छायाचित्र फेसबुकवर प्रसिद्ध करं. ते सरस्ले बहूमोल वाटनं. त्यास्नी आपला संशोधनात्मक लेखम्हा, ते चित्र लोकप्रभाले प्रसिद्ध करं. माल्हे लेखबी धाडा. हाई त्यास्नी गुणग्राहकता. दुसाराले तेन्हं महत्व देनं, मोठं करनं, याले मन मोठं लागस. ते सरस्कडे शे. त्या कुठेबी गयात, म्हनजे सोबत एक वही ठेवतस. तिवर त्या, त्या भागना बोलीना संवाद, शब्द, म्हणी, वाक्प्रचार, चालीरीती, अवजार, भांडी यास्न्या नोंदी टिपी लेतस. घरयेवावर त्यानं वर्गीकरन करीसन, आपला संग्रह वाढावतस. याम्हाईन त्यास्नं संशोधन पूरं व्हयेल शे. त्यास्ना संशोधनात्मक कार्याले शासकीय, विद्यापीठीय आणि संशोधनात्मक दृष्ट्या मान्यताप्राप्त व्हयेल शे. त्यास्ना संशोधनामुये खान्देशम्हातला ठाकर समाजना लोकस्ले जात प्रमाणपत्रं भेटनात. त्यास्ले हक्क, शिक्षण, नोकऱ्या, अनुदान भेटनं. यासाठे त्यास्ले लढनं पडनं. संघर्ष करना पडना. हाऊ संघर्ष त्यास्ना जीववर उठना व्हता. संसार उध्वस्त होवू शकता. त्यास्ले चूकीना पध्दतथून अटक झायी. अनेक कलमं लावायनात. मातर, त्या डगमगना नहित. त्या भिडनात, लढनात आनी विजयी झायात. याच काळम्हा त्यास्नी शासनकडे दाखल करेल संशोधनात्मक काम डॉ. गोविंद गारे या एक आयएएस अधिकारीनी हडप करी लिंथं. त्यावर त्यान्ही परस्पर, स्वतः एक पुस्तक छापी लिन्ह. ते डाॅ. सूर्यवंशी यास्ले समजनं. तव्हयबी त्या चूप बठनात नही. आपला हक्कासाठे पेटी उठनात. तेस्नी काॅपी राईट ॲक्टनी केस टाकी, त्या अधिकारीले उघडं पाडं. माफीनामा लिखी लिन्हा. तठेबी तेस्ना विजयच झाया. करं की व्हस, पन कराले जोयजे.! असं त्या म्हनतंस.
वापीना आहिराणी साहित्य संमेलनना निमित्ताथून, नातास्ना धागावर बठेल धुयमाती झटकायी गयी. जुनं नातं, नवं झायं. आहिराणी लोकसाहित्यावर यान्हा पहिले डॉ. दा. गो. बोरसे, यास्नीबी मौलिक संशोधन प्रसिद्ध करेल शे. ते माल्हे भेटीन कां म्हनीसन मी एकदा सरस्ले फोन करा. त्यास्नी तठेज व्हकारा भरा. मातर, त्यासाठे घर भेट देवानी अट त्यास्नी घाली. मीबी सत्वर तयार व्हयीगवू. त्यासाठे, मित्र रमेश धनगर, एकनाथ गोफणे आनी समाधान सोनवणे आम्ही एकजूट करी कन्नड गऊत. एक कर्मयोगीले, त्यान्हाच कर्मभूमीमा भेटनूत. संवाद साधा. मनसोक्त चर्चा करी. सौ. मीनाताईस्नी खापरवरनी पुरणपोयी आणि आमरसना आग्रहपूर्वक पाहूनचार करा. मननी आनी पोटनी तृप्तता झायी. समदी आमना फिटी गयी. एक वेगळंच समाधान या स्नेहभेटम्हा आम्हले भेटनं.
डाॅ. रमेश सुर्यवंशी यास्ना जन्म १ जून १९५६ रोजी शिंदाड ता. पाचोरा जि. जळगावम्हा एक शेतकरी कुटुंबम्हा झाया. बालपन आनी प्राथमिक शिक्षण खान्देश व मराठवाडाम्हा तर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षन मराठवाडा व नागपूर विद्यापीठम्हा त्यास्नी करं. १९७९ पासून विदर्भ व मराठवाडाम्हा अनुक्रमे पैठण ,दाभापहूर, बाळापूर, पारस आणि कन्नडले, इंग्रजी या विषयना उच्च माध्यमिक शिक्षक म्हनीसन, त्यास्नी एकून ३४ वरीस सेवा करी. नागपूर विद्यापीठम्हाईन १९८४ साले बी. एड. झायात. भाषाशास्त्र या विषयम्हा १९८९म्हा पीएचडीनी संधी त्यास्ले भेटनी. त्यास्नी अहिराणी बोलीना समग्र अभ्यासना तीन पुस्तकं, १९९७ सालम्हा पुनाना अक्षय प्रकाशन मार्फत प्रकाशित करात. यासाठे त्यास्ले त्या काळम्हा भलतिज आर्थिक विवंचना भोगनी पडनी. नोकरी अस्थायी व्हती. पगार अनियमीत. लेखनसाठे वनवन फिरस्ती करनी पडे, लेखन खर्च, प्रकाशनखर्च यास्नी हातमियनी करतांना, पैसास्नी चनचन भासे. तव्हय त्यास्नी धरमपत्नी सौ. मीनाताई सूर्यवंशी पुढे उन्यात, आपली गयाम्हातली मंगलपोत काढीसन त्यास्नी ती, सरस्ना हातम्हा दिन्ही. ती मोडीसन पैसा उभा करा. असा धिरना सल्ला दिन्हा. सरस्ना डोया भरीउनात. मोठा बाळा परसंग व्हता तो. सौ. ताईस्ना त्यागमुये आज, आहिराणीना हाऊ अमुल्य ठेवा जगसमोर उना. घरनी लक्ष्मीनी आपली गयानी "पोत" दिन्ही, म्हनीसन आहिराणी बोलीनी "पत" समाजम्हा वाढनी, असं म्हनं तं ते वावगं ठराऊ नही. पुढे आदिवासी भिल्लस्नी बोली आणि आदिवासी ठाकरस्नं सामाजिक व सांस्कृतिक जीवन लघु प्रकल्प, शासनना आदिवासी विभागाले सादर करीसन डॉ. सुर्यवंशी यास्नी स्वतःनी आदिवासी ठाकर डॉट कॉम हाई वेबसाईट २०१२ पासून सिद्ध करी. औरंगाबाद जिल्हाना आदिवासी ठाकरस्ले प्रवाहम्हा आनासाठे त्यास्नी १९८६ पासून सतत संघर्ष करा. हाऊ लढा लढताना त्यास्ले, आपला संस्थाचालकस्नाबरोबर समाजना धनदांडगास्ना आनी शासकीय अधिकारीस्नाबी विरोध पत्करना पडना. मातर, प्रबोधन सेवा, अभयारण्य, पर्यावरण, पर्यटन, आदिवासी बोली आनी संस्कृती संशोधन, ह्या त्यास्ना आवडता विषय व्हतात, त्या या विषयपासून स्वतःला दूर ठेवू शकनात नही. त्यास्नी करेल कामस्मुये खान्देशना सामाजिक, सांस्कृतिक आनी शैक्षणिक विषयस्वर मोलनं संशोधन आणि लेखन व्हयेल शे. यासाठे डॉ. सुर्यवंशीस्नी ज्या कठीण परीश्रम करात, त्या अतुलनीय असाच शेतस. शब्दकोश तयार करासाठे त्यास्नी वापरेल कागदी कार्डांस्ना, दोन पोता भरेल व्हतात. त्या काळम्हा तंत्रज्ञान इतलं प्रगत नव्हतं. हस्तलिखितवरुन टंकलेखन करनं पडे. खेडोपाडी, गावोगाव, वाड्यावस्तींवर फिरीसन, गोया करेल हजारो शब्द, त्यास्नं वर्गीकरण, आकारविल्हे गुणविशेष, उत्पत्ती, व्याकरणात्मक नोंदींसह घडीघडी लिखनं पडे. यासाठे त्यास्ले घरधनीन सौ. मीनाताईंनी लेखनीक म्हनीसन मदत करी. त्यास्नी सिध्द करेल पुस्तकस्ना हस्तलिखितस्नी एक गोदरेजनी कपाट भरेल शे. हाई आहिराणीनी अनमोल अशी संपत्ती शे. तिन्ह जतन व्हवाले जोयजे. ती नवा संशोधकस्ले कष्ट करानी, सातत्यानी, चिकाटीनी प्रेरणा आणि जिद्द देवू शकस. हाई काम आपलं कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठनी हाते लेवाले जोयजे.
डाॅ. सुर्यवंशी यास्नं अहिराणी भाषा-वैज्ञानिक अभ्यास, अहिराणी बोली म्हणी वाक्प्रचार, अहिराणी शब्द कोश ह्या पुस्तकं १९९७ सालम्हा प्रकाशित व्हयेल शेतस. प्रांजल हाई मराठी कादंबरी १९९९ सालम्हा उनी. खानदेशना कृषक जीवन साचित्र कोष, हाऊ खानदेशी जन जीवनवर आणि कृषक समाजना जगावर भाष्य करणारा सचित्र कोश २००२ साले प्रकाशित झाया. आप्पासाहेब नागरकर जीवन आणि कार्य हाई व्यक्तिचित्र त्यास्नी २००५ सालम्हा प्रकाशित करं. खान्देशना विविध म्हणीस्नं वर्गीकरणात्मक संकलन २०१० रोजी उनं. बोली आणि प्रमाणभाषा (खान्देशी), लोकसाहित्य आणि अभ्यास विषय (खान्देशी), आदिवासी ठाकर समाजशास्त्रीय अभ्यास, अहिराणी बोलीना पहिला शब्दकोश, कन्नड तालुका दर्शन-गवताळा अभयारण्य, माणसं जगण्यासाठी- की वनखाते पोसण्यासाठी, भारत नी लाडकी लेक - परतिभाताई पाटील, अहिराणी बोली सुगम व्याकरण, आदिवासी ठाकर डॉट कॉम, अजिंठ्याचे डोंगर पर्यटन, असा गंजच पुस्तकं डॉ. सूर्यवंशी यास्ना नावावर शेतस. त्यास्नी ठाकर समाजासाठे जो संघर्ष करा आनी त्या संघर्षाम्हा त्यास्ले स्वतःले जो शारीरिक मानसिक, आर्थिक त्रास सहन करना पडना, त्या अनुभवस्ले शब्दबद्ध करीसन त्यास्नी "शरणागत" अर्थात "प्रपत्ती" हाई कादंबरी सिद्ध करेल शे. जी २०१८ म्हा प्रकाशित झायी. त्यावर लवकरच एक चित्रपट येनार शे. त्यास्नी हाई आहिराणी साहित्य सेवा देखीसन, तेस्ले चाळीसगावना ३ रं, अखिल भारतीय आहिराणी साहित्य संमेलननं अध्यक्षपद भुषाडानी संधी भेटनी व्हती. हाऊ तेस्ना साहित्य सेवाना गौरवच शे. एवढं विपुल साहित्य लेखन करीसनबी, डॉक्टर सूर्यवंशी यास्ना मनम्हा अजूनबी संशोधननी ज्योत जागी शे. भविष्याम्हा, आपन अजूनबी काही संशोधनात्मक पुस्तक प्रकाशित करसूत असं त्या आत्मविश्वासथून सांगतस. जो आजकालना नवा पिढीम्हा दिखावत नही.
सर निवृत्त अशीसनबी निवृत्त वाटतत नही. त्यास्नी निवृत्तीनंतर स्वतःसाठे गौताळापरीसरम्हा, हायवेले लागीसन, खेतीना एक छोटासा तुकडा लेयेल शे. तठे त्यास्नी एक टुमदार असं तुलशी फार्म हाऊस बनाडेल शे. त्याल्हेच जोडीसन तुलसी रिफ्रेशमेंट हाई एक हाटेल उभं शे. मांगल्हा बाजूले, सरस्नी स्वतः राबिसन जैविक शेती फुलाडेल शे. रासायनिक खतं, फवारा, औषधी टाळीसन, नैसर्गिक पध्दतथून त्या शेती करतस. या छोटासा खेतम्हा केळी, आंबा, पेरु, सिताफळ, शेवगा, निंबू, तुयशी, आलं, कांदा, लसूण, कोथिंबीर, गहू, आणि अनेक प्रकारना फुलझाडस्नी खेती फुलाडेल शे. यशस्वी करी दायेल शे. शब्दास्मा लिलया रमनारा हाऊ शब्दप्रभू, मायमाटीशी नातं जोडत, माटीम्हा राबणारा कर्मयोगी बनीजायेल शे. आपल्या गरजा मर्यादीत ठीसन, आपली तुटपुंजी धनसंपत्ती आहिराणी, भिल्ल, ठाकर समाजना बोलीनी ग्रंथसंपदा निर्माण करीसन आनी खेतम्हा राबिसन, त्या तृप्तमनथून जीवन जगी ऱ्हायनात. त्यास्ना दोन्ही आंडरी, साॅफ्टवेअर इंजिनियर शेतीस. लहानी सौ. स्वप्नालीताई अमेरीकाम्हा तर मोठी सौ. शितलताई मुंबईम्हा, आपापला क्षेत्रम्हा उच्चपदवर यशस्वीपणे कार्य करी ऱ्हायन्यात. ज्या आंडरीस्ले आपण वेळप्रसंगी ३५ रुपयासुध्दा देवू शकनू नही, त्या पोरी, शिक्षण लिसन स्वतःना पायावर उभ्या शेतीस, नुकतीच एकनी ३५ लाखनी गाडी लिन्ही, हाई सांगतांना एक बापना चेहऱ्यावरलं समाधान, कसाम्हाबी मोजता येनार नही, इतलं ते अमुल्य शे असं माल्हे वाटस.
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नये ! असं अनंत फंदी म्हनतंस. मातर, डॉ. सूर्यवंशी यास्नी धोपट मार्ग सोडिसन, बिकट मार्ग निवाडा. त्यावर निष्ठाथून चालनात. आनी यशस्वी व्हई दावं. असं त्यास्नाशे बोलतांना जानवनं. अनंत फंदींनी सांगेल बठ्ठा सर्वा गुनस्ना समुच्चय मातर, त्यास्नाम्हा शे. म्हनिसन, त्या माल्हे इतरांपेक्षा वेगळा वाटतंस. स्वकष्टाथून समाज हितासाठे, समाजना भलासाठे जो झटस, त्याले समाज येडा म्हनस. मातर, असा येडा मानसंच इतिहास घडावतस असं इतिहास सांगस. खान्देशनी बोली आनी संस्कृतीनं येड लागेल, हाऊ भला माणूस, मन्हा गुरु, दोस्तार, सखा शे, येन्हा माल्हे, सार्थ अभिमान वाटस. त्यास्ना सोबतना हाऊ सुगंधी दरवय, माल्हेभी संशोधनात्मक कार्यानी प्रेरणा, बळ देत राहिन. ती प्रेरणा लिसन आम्ही, भरायेल मनथून त्यास्ना निरोप लिन्हा. आहिराणी मायबोलीनं वारं जसं आम्हना आंगम्हा भराई जायेल व्हतं. तिन्हा जागर आनी प्रसारसाठे आम्ही आते सिध्द व्हयेल शेतस. ६वं अखिल भारतीय आहिराणी साहित्य संमेलनम्हा डॉ. सुर्यवंशी यास्ना विशेष गौरव व्हयी ऱ्हायना. आहिराणी मायना या माणिक - मोतीस्न जतन व्हवाले जोयजे. तेस्ना आपण ऋणाईत ऱ्हावाले जोयजे. तेस्ना जागोजागी आरस्तोल कराले जोयजे. याम्हाईन नवा पिढीले आदर्श दिखतीन. प्रेरना भेटीन.
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
पिन कोड : ४२५१०५.
(९४२३४९२५९३/९८३४६१४००४ )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा