अहिरानी बोली - @JagarAhiraniMayana

'अहिराणी बोली जागर अहिराणी मायना' 

मित्रहो अहिराणी बोली हे फेसबुक पेज जवळपास २०१७ पासून तयार करण्यात आले होते. सदर पेजवर काही अहिराणी मायनां लेकरं फक्त 'अहिराणी' हा शब्द बघून जुळले होते. परंतु अहिराणी बोली या फेसबुक पेजवर सुरुवातीच्या काळात कोणत्याही प्रकारचे लिखाण (पोस्ट) झालेले नव्हते. त्यानंतर मार्च २०२० पासून महाराष्ट्र शासनाने 'कोरोना' या महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉक-डाऊन घोषित केला. त्यानंतर या पेजवर आपण काहीतरी करावे, अशी कल्पना सुचली.

सर्वच लोकं घरात बसून होते. लोकांना कशाततरी रममान होणं गरजेचं होतं. टीव्हीचं अतिरेकी कोरोना वत्तांकन लोकांना नकोसं झाले होते. अशातच अहिराणी बोली फेसबुक पेजवर लाइव्ह येवून घर बसल्या आपली भूमिका स्पष्ट करता येईल या विचाराने असंख्य साहित्यिक कार्यक्रमात स्वखुशीने सहभागी झाले. त्यानंतर अहिरानी बोली हे फेसबुक पेज सर्व खानदेशी सारस्वतांच्या जीव्हाळ्याचं आपुलकी चे फेसबुक पेज बनले आहे. (क्रमशः)

'अहिराणी बोली- जागर अहिराणी मायना'

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय - कवी पी पी पाटील

अमयनेर संमेलन नी कहा गोट

आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी

भारतीय ग्रामीण संस्कृतीदर्शन, ग्रामीण जीवन युद्धाचा आणि नात्यांचा सुंदर गोफ - गल्लीनी भाऊबंदकी