आम्हना बबल्याना उलटा चस्माम्हाईन जगदुन्यान भरेल विश्व आहिरानी ऑनलाईन संमेलन....@त्रिवेणीकुमार
************"********************""""**"**** बबल्या कालदीन मोबाईलमा डोक घालीसन मारोतीना पारवर बशेल व्हता. सदानकदा बचाया पणा करणारा बबल्या आज गयरा धीर गंभीर व्हता. म्हणीसन, साला ह्या बावचायेल पोरस्नी तेन्हा फिस्कावर दिन्ह मिठ चुयी.... मंग बबल्या नी आप्ला चस्मा गंजीफ्राम वरी पुसी काढा.. तसा बबल्या म्हणजे दिसाले वागाबोलाले बानट दिसस, पण साला त्या जाडा भिंग ना काचस्ना चस्माम्हाईन तेल्हे उलटा न सुलट, नी सुलट नी उलट दिसस.... तेन्हा चस्मावर कव्हय मव्हय कागद बी चेटायी टाकस... आसा हाऊ बबल्या... पोरस्नी तेल्हे बावचाळावर तो बठ्ठास्ना आंगवर खेखसाई उठणा. मंग सुपड्या बोलणा, बबल्या आज कथा भवडाले जायेल व्हता रे? बबल्या बोलणा, "काही नही रे भो, आप्ल विश्र्व आहिरानी ऑनलाईन संमेलन न नारय फोडले जायेल व्हतु.... पण साल ते डोकाम्हायीन काही जायी ह्रायन्ह नही. तसा आगाजा जोरबंद व्हता... पेपर, सोशल मेडीयामा ते धूम मचायेल व्हती. म्हणीसन मी बी गयतु. तस नारय चांगल फुटन पण साल एक गोट टकुराम्हायीन जातस नही. *त्या विश्र्व आहिरानी ऑनलाईन संमेलन मजार मातर कमय फुलेल...