आम्हना बबल्याना उलटा चस्माम्हाईन जगदुन्यान भरेल विश्व आहिरानी ऑनलाईन संमेलन....@त्रिवेणीकुमार

************"********************""""**"****
बबल्या कालदीन मोबाईलमा डोक घालीसन मारोतीना पारवर बशेल व्हता. सदानकदा बचाया पणा करणारा बबल्या आज गयरा धीर गंभीर व्हता. म्हणीसन, साला ह्या बावचायेल पोरस्नी तेन्हा फिस्कावर दिन्ह मिठ चुयी.... मंग बबल्या नी आप्ला चस्मा गंजीफ्राम वरी पुसी काढा.. तसा बबल्या म्हणजे दिसाले वागाबोलाले बानट दिसस, पण साला त्या जाडा भिंग ना काचस्ना चस्माम्हाईन तेल्हे उलटा न सुलट, नी सुलट नी उलट दिसस.... तेन्हा चस्मावर कव्हय मव्हय कागद बी चेटायी टाकस... आसा हाऊ बबल्या... पोरस्नी तेल्हे बावचाळावर तो बठ्ठास्ना आंगवर खेखसाई उठणा. मंग सुपड्या बोलणा, बबल्या आज कथा भवडाले जायेल व्हता रे? बबल्या बोलणा, "काही नही रे भो, आप्ल विश्र्व आहिरानी ऑनलाईन संमेलन न नारय फोडले जायेल व्हतु.... पण साल ते डोकाम्हायीन काही जायी ह्रायन्ह नही.
          तसा आगाजा जोरबंद व्हता... पेपर, सोशल मेडीयामा ते धूम मचायेल व्हती. म्हणीसन मी बी गयतु. तस नारय चांगल फुटन पण साल एक गोट टकुराम्हायीन जातस नही. *त्या विश्र्व आहिरानी ऑनलाईन संमेलन मजार मातर कमय फुलेल व्हत*... आते आयोजगस्नी कोणले बलावो नही बलावो हायी तेस्नी मर्जी ह्रास... तरी बी कोठे तीरकामठा लागणा नही, घडायना आवाज आजिबात निंघना नही, आणि पंजा ते टायाटिपापुरता दिसना. पण कमय जोरबंद फुलेल व्हत. नी मन्हा मन म्हा उन्ह... खान्देश मजार का साल तीरकामठा नी दोरी तुटी गयी, का घडाय ना मसाला सरी ग्या, का पंजा दुंडा व्हयी ग्या..? बर जाऊ द्या गड्यास्वन तुम्ही न आग लायीसन आंग शेकतस... नी मंग लोक म्हणतस साला हाऊ बबल्या ना तोंडले झाकण नही... नी येन्हा चस्माले दांडी नही. दोरी बांधेल चस्मा उलटाच घालेल ह्रास.
        बाकी खरं सांगु का? माय अहिरानी कालदीन पाचपक्वान कुमाचडी ह्रायंन्ती.. वट्टा, गल्लीवरनी, मन्ही अहिरानी मंत्रालय ना आंगे पांगे भिडेल व्हती... यशवंतराव प्रतिष्ठान म्हणजे समिंदर ना काटवर, गयरा हारीक वाटना, आप्रुक वाटन. बाकी दखा भो माल्हे अहिरानी ना लोभ शे... अहिरानी ना आभिमान शे... पण मी तसा आभिमानी नही शे. तस उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ ना मेढ्या आणि तेस्ना कार्यकर्तास्ले आरस्तोल करस. बाकी जागतिक अहिरानी संवर्धन ना मेढ्या माल्हे नावले दाद्या वाटना. तस संमेलन मजार दोन लोकस्नी डरकाळी जोयजे व्हती, एक संमेलन ना आध्यक्ष, जागतीक अहिरानी संवर्धन ना मेढ्या, नी तिसरा गुजास्ताना संमेलन ना मेढ्या... पण कस शे हाऊ पुढाकार मंडळ ना व्हता.. धावपय बी तेस्नी व्हती म्हणीसन तो तेस्ना येक्तीगत इषय शे. मन्ही अहिरानी भलती सजेल व्हती. साजेल व्हती. आज तीन्हा गाजावाजा व्हता.
        संमेलन न नारय फोडा करता, मा देवेंद्र फडणवीस भु ऑन लाईन व्हतात. नारयटोपीना मेढ्या व्हतात आप्ला चायीसगावना आमदार मा मंगेश चव्हाण भु, जामनेर ना आमदार मा गिरीश महाजन भु, इधानपरिषद ना आमदार मा निरंजन डावखरे भु व्हतात. मा इकास पाटील भु, मा आदरणीय हटकर बाप्पा, संमेलन न नारय हातमा लिसन बशेल व्हतात संमेलन ना मेढ्या डाॅ एस के बापु, आणि हा पुणाना संवर्धन मंडळ ना कारभारी बशेल व्हतात मा आदरणीय पिंगळे बाप्पा... तेस्नी ध्यान बठ्ठी त्या संमेलन ना हात मजारला नारय वर व्हती. पण मेढ्या बी कटबन व्हतात, नारयनी शेंडी घट्टुम पकडेल व्हती. संमेलन न उद्घाटन ऑनलाईन मा देवेंद्र फडणवीस भु येस्नी कर... नी संमेलन ना मेढ्या न नारय हातमा न हातमा ह्रायी गे. मा फडणवीस भुस्न भाषण मस्त व्हयन... शिकाडेल मिठ्ठुना मायीक मस्त अहिरानी मजार तेस्नी बोलाले सुरवात कयी... तव्हय मातर भो मन्ही साती ५६ इंचनी फुगी गयती. तेस्नी आप्ली भाषा न कवतीक कये.. काय मदत लागीन ते आरधी रातले उभा ह्रासु. म्हणे ते काय परिशिष्ट ८ मजार जावा करता केंद्राकडे तुम्हणा करता जासु सांग.
         तस हायी संमेलन मजार उत्तर महाराष्ट्र विकास मंडळ ना मेढ्या नी गयरी मेहनत व्हती. पायले भिंगरी बांधेल व्हती... ते कालदीन दिशी ह्रायंन्त. बाकी त्या बी कमय ना बाग ना मायी शेत तेन्हामुये कमय फुलन व्हयीन काही नवल नही. तेस्नी प्रस्तावना आणि आव्हान कये. बठ्ठा मंडळ मुंबई मजार खान्देश भवन मांगतस तस तेस्नी बी मांग... पण आप्ला पुढारी राजकीय बहयरा शेत. आस काही मांग की त्या चोट्टास्ना मायीक बसतस. अहिरानी संवर्धन करता बी तेस्नी कायपात दिशी वुन्ही.. बाकी तेस्ना कामले मन्हा सलाम शे... पण तेस्नी मती ना, नी गती ना आंदाज येत नही... हायी एक आन्ह शे... ते जर सुटन ते मा इकास पाटील भु भविष्या ना गयरा मोठा अहिरपुत बनतीन.
         मा. मंगेश चव्हाण भु नी सूद अहिरानी मजार भाषण ठोक. तेस्नी तयमय दिसनी.. तरणा आमदार म्हणीसन माल्हे तेस्ना गयरा आभिमान वाटना. तेस्न भाषण म्हणजे माय अहिरानी नी पालखी ना झोका व्हता.
बाकी मंग जे व्हवाले नको ते व्हयन, संमेलन ना मेढ्या ले मजारज भाषण करान सांग, माल्हे आंचंबा व्हयना... नी जरास मनले वाटन आज आम्हना खान्देश मजार गाजेल गयब्याले चिनबाव्हल करी टाक. तसा तेस्ना नी संमेलन ना उद्घाटन ना समंद फक्त हातमा नारय देल पुरता वाटणा. संमेलन ना बठ्ठा सूत्र दोन लोके समायतस, माव्हेल मेढ्या, नी उगायेल मेढ्या..
माव्हेल मेढ्या मा आदरणीय हटकर बाप्पा ना भासन मजार काही दम वाटना नही. नही ते तेस्न भाषण म्हणजे मरेल मढा बी जित्ता व्हतस. पण काय माहित तेस्ले काय भानामती ना फेरा येल व्हता. पण तेस्नी माय अहिरानी करता दान मांग, झुयी पसारी... आते त्या झुयीले कितला राजआश्रय मियस काय माहित? का ह्या चोट्टा लोके झुयी बी उपाळी देतस. संमेलन ना मेढ्या न भासन सुरवात चांगली झायी, पण येन बंधन न निप्पल तेस्ना गया मजार बांधेल व्हत म्हणीसन.... त्या सारखा भासन करेत नी त्या निप्पल कडे दखेत. तरी बी तेस्नी माय अहिरानी, नया साहित्यिक, नी तेस्न लिखाण ना बारामा तयमय दिशी उन्ही... शेवटली कविता मजार तेस्नी नादारी न हु न नाव दिसन माय अहिरानी आणि तीन्ही मोठायकी सांगी दिन्ही.
     शेवटल भाषण मा गिरीश महाजन भु न.... तेस्न भासन म्हणजे नुस्त गिरणा, तापीना नदीना खडक वर धोन आपटेल सारख व्हत नी... नारपार आटेल सारख व्हत. बाकी ना वक्तास्नी तेस्न इतल कवतीक कर इचारु नका... बय इतल बी कवतीक नही कराले जोयजे भो.... नही ते सुकायेल पऊ बी, पावसायाना पऊ सारखा फुलेल दिसस. जितला बी वक्तास्नी माय अहिरानी करता काही मांगेल व्हत... त्या मींगणीस्ले भाऊ नी उच्चा बगल करी दिन्हात. आस ठामपणे सांगच नही की, मी करसु का दिसु... पण आते कस ह्रास भो, मन्हा सारखा लोक माय अहिरानी नी कुस भरा करता जातस, तेन्हामुये गांधीजीना तीन बीलबांदरस्ना माईक बस्न पडस.
      संमेलन न नारय कव्हय फुटन? कस फुटन हायी संमेलन ना मेढ्याले कयन की नही कयन माहीत नही, पण शेवटलगुन नारयनी चुटुटी तेस्ना हातमा व्हती... नी मा आदरणीय पिंगळे बाप्पाना हात मा काही ती गयी नही... खोबर मातर कव्हय कमयना फुलवर गे ते कयनज नही... पण भुंगा मातर ते नारन खोबर खावा करता कमयना मांगे मवरे मिरी ह्रायन्हांत. मी चस्मा वापीस पुसी काढा नी संमेलन डोयाभरी दखी लिन... जीव निवायी लिन्हा. बठ्ठा राबणारा हातस्ले माल्हे आरस्तोल करो आसज वाटस.
          पोटमा हाळ्या काव काव करेत... मंग जेवण ले गऊत. जस संमेलन पाचपक्वान न भरेल व्हत... तसच जेवण नी बी येवस्था व्हती. काय म्हणतस पंचतारांकित की काय त्या हाटेल म्हा जेवण व्हत... माय अहिरानी गयरी तोरामा व्हती... आम्ही बी जेवण ना ताव मारा मा व्हतुत. मस्त नल्लालगुन जेवनुत... नी बाहेर निंघनुत. जेवण नी चर्चा चालु व्हती... कोणी म्हणे मा आमदार मंगेश भु नी सोय करेल व्हती, कोणी मा इकास भु नी करेल व्हती.... मी चस्मा नी दोरी मांगे फिट्ट बांधी नी मनमा ना मनमा बोलनु, बयंजु आरे टरबूज सुरीवर पडो, नही ते सुरी टरबूज वर पडो..... तुम्ले खावाशी मतलब... कसाले पाहिजे चमार चवकस्या.....
हायी बठ्ठ संमेलन बबल्याना उलटा चस्माम्हाईन दिसन..... तस तेन्ही पार ना वट्टावर सांग नी.... बडबड करत मोबाईल चिवडत चालना ग्या... म्हणे उठा रे.... आते च्यार वाजता परत संमेलन दखन शे.... तवशी कोणी तरी कोकावन ओ बबल्या आज तरी चस्मा सुटला लावजोरे.....
बबल्या न सबद नीसबद टीपनारा....
त्रिवेणीकुमार
9004932626

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय - कवी पी पी पाटील

अमयनेर संमेलन नी कहा गोट

आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी

भारतीय ग्रामीण संस्कृतीदर्शन, ग्रामीण जीवन युद्धाचा आणि नात्यांचा सुंदर गोफ - गल्लीनी भाऊबंदकी