ग्रामीण कृषक संस्कृतीना जागर......* डाॅ. सदाशिव सुर्यवंशींस्नं "घर-वावर"
*ग्रामीण कृषक संस्कृतीना जागर......*
*डाॅ. सदाशिव सुर्यवंशींस्नं "घर-वावर"* :
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
मंडई, आज मन्हा दोस्तार डॉ. सदाशिव सुर्यवंशी यास्ना "घर-वावर" या कविता संग्रहानं प्रकाशन व्हई ऱ्हायनं. या कार्यक्रमले शुभेच्छा. संग्रहाबद्दल, या मन्हा दोन सबद....
काळ जसा बदली ऱ्हायना तशतशी आपली भाषा, संस्कृती आणि संस्कार धिरधिरे लोप पायी ऱ्हायनात. आपन, स्पर्धाना युगम्हा जगी ऱ्हायनूत. येम्हा इंग्रजी भाषांना मांगे पयता पयता, मराठी मांगे पडी ऱ्हायनी. आनी, आपली मायबोली आहिराणीना तं, जसा दम घुटी ऱ्हायना. एखादी बोली, भाषा वापरम्हाईन हद्दपार व्हस, तव्हय तिन्हा शब्द, म्हनी आनी वाक्प्रचार गमी जावानी भिती ऱ्हास. आपला हाऊ आनमोल खजिना, आपला हातम्हाईन गमी जाईन, लुप्त व्हयी जाईन, तव्हय तेस्नं महत्व आपले समजीन. मातर हायी ये येवू नये, म्हनीसन गंजच लेखक, कवी, आभ्यासक आनी संशोधक मंडई पुढे सरसायेल शेतस. त्या आपली बोली, आपली भाषा, संस्कृतीले जगाडाना प्रयत्न करी ऱ्हायनात. धुयाना, डॉ. सदाशिव सुर्यवंशी तेम्हातलाच एक शेतस. त्या आपलं लेखन आहिराणीम्हा लिखी ऱ्हायनात. त्यास्ना "घर-वावर" हाऊ कविता संग्रह नुकताज हातम्हा पडना. जो आहिराणीना समृध्द वारसाले चारचांद लावले सज्ज शे. आपली आहिराणी हाई गावंढळ, ग्राम्य, मागास नही, तं तीच खरंसोनं शे. अस्सल धन शे. आनी, तीच आपली संस्कृती शे. तिम्हाईज आपलं प्रगतीनं कवाड खुली ऱ्हायनं, हाऊ विश्वास डॉ. सुर्यवंशी येस्नं लेखन देस.
साहित्यानी निर्मिती म्हणजे एखादी कलकृतीनी निर्मिती. तसा तो एक अविष्कारच ऱ्हास. म्हनीसन साहित्य निर्मितीना अभ्यास करना झाया, तं पहिले भाषाना ईचार करनं महत्त्वानं शे. त्याम्हान नी त्याम्हान अहिराणी साहित्याना ईचार करना शे. म्हणजे, अहिरणी बोली भाषा समजी लेनी पडीन. अहिराणी हाई खान्देश म्हनजे जयगांव, धुय्य, नंदुरबार आणि नाशिक जिल्हाना काही भागमां बोलतस. खान्देशना अहिरस्नी भाषा म्हणजे अहिराणी. हाई भाषा हजारो वर्ष जूनी अस्नी तरी ती लिखीत स्वरुपमा जास्ती दिखत नाही. पहिलेपासून ती बोली म्हनीनच चालत यी राहिनी. मानवी जीवनमा एकमेकथून संवाद साधाले, भावभावना वाटीलेवाले, आपली बोलानी भाषाच उपयोग म्हा पडस. म्हनीसन खान्देशमा अहिराणी रुजनी, वाढनी, एक पिढीकडून दुसरा पिढीकडे जाई ऱ्हायनी. याम्हा आहिराणी सिडीस्नी मोठी भुमिका बजाडेल शे, सा. शब्दशिल्पनी मांडयले पहिलं आहिराणी साहित्य संमेलन लिसन आहिराणीना जागर सुरु करा. पुढे आहिराणी कस्तुरी मंच-पणे, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास परिषद आणि खान्देश साहित्य संघ यास्नी वेगवेगळा संमेलनं लिसनी खान्देशी लोकस्ले आहिराणीबद्दल जागृत करानं काम सुरु करेल शे. एक चळवळ या निमित्ताथून सुरु व्हयेल शे. त्यामुयेज आज आहिराणी साहित्यानी निर्मिती व्हयी ऱ्हायनी. आहिराणी लिखीत स्वरुपम्हा संग्रहीत व्हयी ऱ्हायनी. त्या साखयीम्हा सदाशिव सुर्यवंशी येस्नं "घर-वावर" या कवितासंग्रहानी एक कडी, म्हनजे दमदार पाऊल पडी ऱ्हायनं. हाई आनंद आनी अभिमाननी गोट शे.
सदाशिव सुर्यवंशी या एस. एस. व्ही. पी. एस. कालेजम्हा प्राध्यापक, डॉक्टर म्हनजे संशोधक जरी असनात, तरी तेस्ना खरा पिंड हाऊ शेतकरी म्हंजे बळीराजाना पिंड शे. गावगाडा, शेतशिवार, मायमाती, घरदार आनी नातागोतास्ना तेस्ना ऋणानुबंध घट्ट शेतस. जगरहाटी करता करता जे अनुभवनं संचित तेस्नी जमाडेल शे, ते आपली बोली आपली भाषाम्हा मांडाना तेस्ना प्रयत्न आरस्तोल करवो असाच शे. तेस्ना अभ्यास, त्यावरनं चिंतन, मनन आणि मनम्हाईन येयेल भाष्य, तेस्नी कवितास्ना रुपम्हा मांडांना प्रयत्न करेल शे. जो ग्रामीण जीवनना आरसा शे आसं माल्हे वाटस. तेस्ना कविता म्हा काय नही ? घरशे, घरम्हातला मानसं, तेस्ना नाता गोता, घर चालाडाना उद्योग. तेम्हा आपली खेतीबाडी. खेतीना औजारं. कृषी संस्कार, संस्कृती आणि खेतमा राबनारा हातस्ना समदा कामं, यास्नं चितरंग तेस्नी शब्दस्ना माध्यमथून मनफाईन चितारले शे.
माय-बाप खेतमा राबनारा. म्हनीसन बळीराजानी व्यथा तेस्नी प्रत्यक्ष अनुभवेल शे. खेती करनी व्हयीन, तर खेती म्हा खेतीसारखं व्हनं पडस. आंगले माटी लाई, सूर्यानं उन आंगवर झेलनं पडस. कातडीले चटका खाना पडतस. ढेकायास्मा चालीचाली पायना आंगठा फुटी जातस. आनी, तसाज बारा धराले पानीम्हा उभं ऱ्हायनं, तर बोटं सडी जातस. पायस्ले चिखल्या पडतीस. तव्हय कोठे खेतम्हा पीक उभं ऱ्हास. हाऊ अनुभव कवी असा मांडस.
बये उन्हमां रंगत,
कायी चामडी पडनी,
फुटेल आंगोठानी ठेच,
भरेल बाराम्हा सडनी.
(जिंदगी ना पेच)
बळीराजा आणि तेन्हा जोडीदार नंदी, दोन्हीस्नी गत सारखीज ऱ्हास. पोटम्हा आनना कन नही. तरी राबराब राबनं पडस. बाप तं भूक सहिलेस. पन मुकं जित्राप, भूकना भरांतिम्हा दावं तोडी, वडांग मोडी चाराले भिडीजास. दोन्हीस्नं हलाकीनं जीनं मनले चरा पाडस.
दोर तुटना बैल सुटना,
खयानी वडांग मोडी गया.
भुक्या बैल चारेक मैल,
चराले दावन तोडी गया.
(भुक्या बैल)
आसं असनं तरी शेतकरीले काम सुटत नही. ते तं तेन्हा पाचवीलेज पूजेल ऱ्हास. औत, फाटा, जोतं, मुक्सं, पुऱ्हानं, इट्टी, खुटा काही तेन्हा सुटत नही. पहिले शेतकरी बैलस्लेबी आपला घरना सदस्य समजेत. म्हातारा बापनामईक तो दारसे दम तोडे. मातर, आते कसाई तेले सोडत नही. हायी दैना कवी नेमकी टिपस, आनी सबदस्मा गुफस.
जोते मुक्सा पुऱ्हानं इट्टी,
घोगर रेजा तुटीगई घाटी.
घरना बैल खुटावर मरे,
आज कसाई वाचू देत नही.
(पांढरीना बदल)
कवीनं खेतीबाडीनं निरीक्षण इतलं नेमबंद शे की, तेन्ही नजरम्हाईन खेतीनं कोनतज काम आनी औजार सुटत नही. तेस्नं शब्दस्न भंडार आनी तेस्ले वापरानी हातोटी डोयासमोर चित्र उभं करीदेस. पेरनीना सगळा साजसिंगार, जो आजना पिढीले माहितबी व्हनार नही, तो समोर उभा ऱ्हास. हाईज तं कायनी गरज शे.
नई नयचाळं फुटस,
कुसली निंघस.
इडं फिट नही बसत,
पुऱ्हानं सांगस.
(पेऱ्हनी)
वावरम्हा गयं, म्हनजे फकस्त पिकपानीज महत्वानं नही रहास. तं तठे उगेल बीनकामनी वाटस अशी आरकाटी, बोरकाटीबी कशी उपेगम्हा पडस, तेन्ह दर्शन कवी घडावस. दिखाले आरकाटी काटेरी ऱ्हास. पन, पेरनी करानंतर हायीज आरकाटी रही बनी, मया लायीसन, बीले माटीवरी पांघरुन घालस. तव्हेज तेले माटीम्हा कोंब फुटस. नहीतं हाईज बीजवार उघडय़ावर पडी चिडीपाखरू खाईजावू शकतस. म्हनीसन वरवर काटेरी वाटणारं व्यक्तिमत्वबी, संरक्षणसाठे कितलं महत्वानं ऱ्हास, हाऊ संदेस पुढल्या ओळी देतस.
पांभेरना मांगे चालीस्नी,
आरकाटी ऱ्हास.
उघडं बिवारं झाकाले,
रही फिरी ऱ्हास.
(पेऱ्हनी)
इतला कष्ट करी पीक खेतम्हा उभं ऱ्हास. डोलाले लागस. शेतकरीनं सपन फुलस. आनी बेमोसमना पानी धुमाया घालस. व्हतानं नव्हतं व्हयी जास. डोयासमोरनी गहूनी रास, कानी बानी हुयी जास. सपन पानीम्हा व्हाई जस. हाईच बळीराजानी नियती शे. कवी म्हनस.
वारा वांधी सुटनी,
सुटना भाऊ पानी.
भरेल गहूनी रासगरी,
रातम्हा झायी कानी.
(गहूनी रास)
कष्ट मातीमोल व्हस. घानानागत राबेल पानीम्हा जास.
असं करतू तं, तसं व्हतं असा इचार मन करस. पन हातम्हाईन काय निंघीजायेल ऱ्हास. शहानपन येस, पन उशीरा. म्हनीसन तं म्हनतस. शेतकरी दिवाईले शाना व्हस.
कष्टकरी मातीमोल,
आयुष्याना घाना व्हस,
भोया कितला कुनबी,
दिवाईले शाना व्हस.
(कुनबी)
दुनिया दुरंगी शे. ती, कामापुरता कोन्हाबी वापर करस. हायी जनरीत कवी आपली रचनाम्हा नेमबंद मांडस. आपेसम्हा कोन्हता व्यवहार करो नही, कारन आपेसम्हाज खापर फुटस. हाई सांगालेबी कवी भूलत नही.
जग दुनिनी शे रित,
काम पुरता वापर.
जर भेटनं आपेस,
फुटे तठेज खापर.
(माय माय म्हनीसन)
शेतकरीनी व्यथा काई आजनी नही. ती तं भडभडती जखम शे. जुनं दुखनं, नवं बनी समोर ई ऱ्हायनं. काटा टुचानं जसं निमित्त व्हस आनी नायटा व्हयी, तेन्हा इफक धायी येस, तशीच शेतकरीनी व्यथा शे. ती या बेरहेम व्यवस्थामुळे इफकनामाईक वाढी ऱ्हायनी.
जुनं व्हयेल दुखनं,
ताजं व्हई ऱ्हायनं.
काटानं नायटं व्हई,
इफक धायी ऱ्हायनं.
(इफक)
जगम्हा जो हापापेलपना वाढी ऱ्हायना, तेल्हे आडा बसाले जोयजे. हायी सांगतांना कवी गरीब दुब्याना करता दयानी प्रार्थना करी ऱ्हायना. फकस्त, आपलं डाचं भरनं, म्हनजे जगनं नही, तं दुसरालेबी दोन घास देवानी शिकवण तो दी ऱ्हायना.
गरीब दुन्यानी दया,
पोटम्हा ठेवो मया.
आपलंच घर भरी,
नुस्ता भरो नही न्या.
(संगे काय येवाऊ शे)
माणुसकी दखाडाले पैसा खर्च करना पडत नही, तं मनम्हा मया आनी तोंडम्हा गोड सबद, इतलंज लागस.
खुटा शाबूत ठिसनबी दयनारस्ले दयानी मदत करता येस, हाई उदाहरण भलतं चपखल बस्स. खेडाम्हा येरायेरना घट्या वापरानी पध्दतज शे.
दयनार दयी जाई,
खुटा थोडा लयी जाई.
पिरेमना शब्देस्माज,
मानुस आपला व्हई जाई.
(कायना घट्या)
खेतम्हा बाप राबस. पन घर तं मायज सजाडंस. ती शेनवरी घर सारस. लिपापुती करस. गहूना चिकवरी चितरंग काढस. जेवन करा. पान खा, पन थुकी थुकी घर रंगाडू नका, स्वच्छता ठेवा. तिन्ही इतलीज कामना ऱ्हास.
या बसा पान सोपारी खा,
पन भितवर थुकू नका.
(सारपोतर)
मायनी तपकिरनी सवयबी कवीना नजरम्हाईन सुटत नही. येलेज सजगपन म्हनतस. तपकीरना डबावरला फेटावाला. दुकानदारनी पूडी बांधानी लकब आणि मायले तपकीर उपासना फरायनागत, कितली प्यारी व्हती, हायी सांगतांना कवी म्हनस.
निरंकटना उपासले,
हाऊज फ्राय ऱ्हाये.
तलप पुरी व्हये मायनी,
खुरपं चालू ऱ्हाये.
(चारानानी तपकीर)
मायबाप म्हनजे दौलत ऱ्हास. तेस्नी छाती बिल्लास, इंच, फुटम्हा मोजावत नही, तं ती बिघाम्हा मोजावस हाई सांगनं, म्हन्जे मायबापनं उचित मोल जाननं. ते कवीनी नेमकं साधेल शे.
बाप मयानं वावर,
माय ममतानी माती,
गरीबिना सवसारे,
तेस्नी बिघाभर छाती.
(घर वावर)
देवनागत जेस्नी पूजा कराले जोयजे, तेस्नं मन जेस्ले जानता येत नही, त्या अभागीच म्हनवो. असा अभागीस्ले जव्हय जनम देनारस्ले खांदा देतायेत नही, तव्हय कवीले त्या पैसापात्र अशीसनबी, गरीबज वाटतस.
जनपतले तुन्ह मन,
जानी लेता उनं नही.
आम्ही अभागी आम्हले,
खांदाबी देता उना नही.
(अभागी)
घरना धल्लापल्ला मानसं म्हनजे घरनी अडगय, असं कोनले वाटत व्हयी, तं ते निरानाम चूक शे. असा अनुभवी मानसं म्हनजे, घरनी शिरमंती ऱ्हातस. म्हतारपन कोनले चुकेल नही, चुकत नही. ते स्विकाराले जोयजे. साठी उनी, तं काठी धराले कसानी लाज. आनी, सत्तरी येता, मस्करी करा. हाऊ संदेस, म्हनजे आनंदी जगानी गुरुकिल्लीज शे, आसं माले वाटस.
साठी गई हाते काठी उनी,
सत्तरी गई ते मस्करी उनी.
(जुनं खोड)
कवी सुर्यवंशी घरदार, खेतीबाडी आनी गावगाडाम्हाज आडकीपडत नही. तं समाजनंबी चिंतन करस. ज्ञानोबा, तुकोबांना वारसा सांगस. शिवछत्रपतींस्ना अभिमान बायगस. फुले, शाहू, आंबेडकरस्नं बोट धरी परीवर्तननी वाट चालस. ह्या प्रवासम्हा तो आपला खान्देशना महाराजा सयाजीराव गायकवाडस्ले कसा इसरी. गोवना पोऱ्या देसना अभिमान झाया यानं तेल्हे अप्रुपज वाटस.
गावना पोऱ्या, देसना राजा,
जगभर डंका, तेस्ना वाजा.
(सयाजीराव)
सयाजीराव महाराजनी आपलं कर्तृत्व सिध्द करी सोताना कामनी छाप उमटाडी. खान्देशना गौरव वाढावा. चौसठ वरीष न्यामिनं राज करं. पेशवास्नी ज्या जात पात, उच निचन्या उतरंडी रचेल व्हत्यात, त्या धसाडी टाक्यात. तेस्ना दात, तेस्नाज घसाम्हा घालीसन इतिहास घडावा. हाई समदं एक लंबीलचक कविताम्हा मांडी, तेस्ना ऋणाईत व्हवाना प्रयत्न करा.
चवसठ वरीस राज्य करं,
बठास्न्या बत्तीसी बठाडी दिन्यात.
पेशवाईना रचेल कावास्न्या,
उर्तनी तुम्हीज धसाडी दिन्ह्यात.
(सयाजीराव)
कविता संग्रहना या काही मोकान्या जागा शेतीस. जेस्नी नोंद लेनं माल्हे महत्वानं वाटस. हाई मन्ह निरीक्षण शे. ते मन्ह ज्ञान, वाचन, अनुभवनं संचित शे. ते तोकडं असू शकस. कारन, मी मांडं यापेक्षा संग्रहम्हा अधिकज शे. येम्हा भाषानं सौंदर्य शे, शब्दस्नी नजाकत शे. प्रतिमा आनी प्रतिकस्नी मनभावन गुफन शे. कविता वाचतांना कोठे कोठे तुम्ही ठेका धराले लागी जाशात, अशी लय शे. हाऊ सारा साजशृंगार नेसीसन डॉ. सदाशिव सुर्यवंशी यास्नी कविता, घरंदाज बाईनागत, भाषांनी श्रीमंतीनं दर्शन घडावस. ज्या आहिराणी भागबल्ली कविता वाचतीन, अनुभवतीन त्या आपली मायबोलीले पुन्यान्दा भेटाना आनंद मिळवतीन. इतर भाषिकस्ले आहिराणी शब्दास्न नवाडपन अडथडा वाटू शकस. कोठे कोठे हाई कविता घाईघाईम्हा, प्रासंगीक वठाडेल सुध्दा वाटू शकीन. त्यामुये ती उगीच लांभनलायेलनागत रेंगांडू शकस. या करता कवीनी, परिषिष्टम्हा मराठी अर्थ दिसन, ती सुबोध कराना प्रयत्न करेल शे. जत्राम्हा मायलेकस्नी ताटातूट व्हयी जास, आनी अचानक त्या येरायेरले भेटतस. तव्हय तेस्नी जी भावना, जो आनंद ऱ्हास, तिच अनुभूती आनी तोच आनंद, मी हाऊ संग्रह वाचतांना लिन्हा. तुम्हलेबी तो भेटो, इतलीज मन्ही अपेक्षा.
जयगावना प्रशांत पब्लिकेशननी, प्रकाशित करेल "घर-वावर" हाऊ आहिराणी कवितास्ना संग्रह म्हंजे, ग्रामीण जगरहाटीना एक चालताबोलता चलपट शे. येम्हा १०४ पानस्मा ५३ कवितास्न अस्सल सोनं दडेल शे. आहिराणी भाषांना आभ्यासक आनी संशोधक डॉ. रमेश सुर्यवंशी यास्नी या संग्रहनी वयखपायक नेमबंद करेलशे. तेस्नी या संग्रहले कृषक संस्कृतीना आरसा अशी साजेशी उपमा देयेल शे. तर लोककवी प्रशांत मोरे यास्नी संग्रहनी पाठराखन करतांना डॉ. सदाशिव सुर्यवंशी (९४०५३७१३१३) यास्नी कविताले कसदार पैठनीनी उपमा देयेल शे. तेस्ना कवितास्ना पैठनीवरला हाऊ मोर तुम्हना आम्हना मनले भुलावाबिगर ऱ्हावाऊ नही, हाई माल्हे खात्री शे. सदाशीवभाऊना या आहिराणी कविता जागरले मी आभायभर शुभेच्छा देस. तेस्ना हाते आहिराणी मायनी अधिकाधीक सेवा, जगदुनियाम्हा लौकिक पावो, हाईच मन्हा मननी ईच्छा शे.
© *प्रा.बी.एन.चौधरी.*
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
४२५१०५.
(९४२३४९२५९३ /९८३४६१४००४)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा