लोकेसनी इकत लेवो म्हणीसनी, कोणी पुस्तक लिखतस का ? - लेखन श्री बापूसाहेब हटकर, मुंबई
✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
आपलं बोध वाक्य से अहिराणी लिखा, वाचा, बोला! 20/25 वरीस फाईन आपुन येना प्रचार करी ऱ्हायनूत. सद्या अहिराणीले खूप चांगला दिनी इ ऱ्हायनात. देसपरदेशना डाक्टर इंजिनेर अहीर भाऊ बहिनी जोरदार अहिराणी बोली ऱ्हायनात. त्यामुळे खेडापाडाना लोकेसमा जो न्यून गंड व्हता, सरम व्हती ती न्हीगी ऱ्हायनी लोक बदाबाद(उघडउघड) अहिराणी बोलाले लागनात. अहिराणी भाषांना सोताना सबदे साठा खूप मोठा से. प्रतिभावान अहिरसनी या एक एक मोती उचला त्यांना हार गुफा नी या हार कथा, कविता, कादंबरी, नाटक रुपमा भायेर काढा. अहिराणी पुस्तके प्रकाशित करा.
मी अहीर लेखकसले हमेशा एक सूचना करस. तुम्ही तुमन अहिराणी आत्मचरित्र लिखा. आत्मचरित्र लिखणार हाऊ कोणी मोठा करारी माणूस, किंवा वयस्कर भादा माणूसज पाहिजे आस नही. तुम्ही तुमन आत्मचरित कोणता बी वयमा लिख तरी चाली. त्यामा तुमना जीवन प्रवास संगे, गावन्या बऱ्याज गोष्टी येतीस. चाली, रीती, रूढी, परंपरा, विशेष घटना, दुर्घटना, लगीन यावं, सन, उत्सेव येतस ते लिखा. नही ते मंग तुमले आवडेल दुसरी कोणती बी भाषान पुस्तक अहिराणीमा रूपांतरित करा. कोणतंबी पुस्तक प्रकाशित व्हवा नंतर 50 वरीसना आत त्यानं भाषांतर रूपांतर करण झाय ते लेखकनी परवानगी लागास, पण त्या पुस्तक प्रकासनले 50 वरीसना वर व्हई ग्यात ते मंग लेखकनी परवानगी लेवानी गरज नही.
पहिला विश्व अहिराणी सम्मेलनना मुख्य वाटाड्या मा पदश्री गणेश देवी सर यासनी बी सुचाड अहिराणीले प्रमाण भाषाना दर्जा देना व्हई ते या भाषामा दर्जेदार लिखाण व्हवाले जोयजे. त्यांना करता अहिर सारस्वतसनी रामायण, महाभारत सारखा ग्रंथ, भारतीय घटना अहिराणीमा अनुवादित कराले जोयजे.
त्या परमाणे मी अहीर सारस्वतसले बोलनु त्यासनी तीन प्रश्न उभा करात.
प्रश्न१-अहिराणीले लिपी कोणती वापरनी?
उत्तर-देवनागरी! म्हणजे हिंदी मराठी लिखाले जी लिपी वापरतस तिज वापरा. त्यामुये पोरेसले एखादी नवी लीपन वझ पडाव नही.
प्रश्न२- प्रमाण भाषा म्हणीसनी कोणती भाषांना वापर कराना ? बागलांनी, धुळे, नंदुरबार का जळगाव जिल्हानी.
उत्तर- तुम्ही तुमना गावमा तुमना घरमा जी भाषा बोलतस त्याज भाषामा लिखा. प्रमाण भाषा नी तिनं व्याकरण तिसरा पिढी वर सोडी द्या. तुम्ही नुसतं लिखा.
प्रश्न३- आम्ही पुस्तके लिखसुत लिखान काही नही. पन लोक त्या पुस्तके इकत लेतत नही.
*उत्तर- मानुस पुस्तके लोकेसनी इकत लेवो याना करता लिखतस छापतस का? ज्ञानेश्वर मावली ते तुकाराम महाराज यासना मझार गनज लेखक नी संत व्हई ग्यात. यासनी आपला साहित्यवर मराठी भाषा समृद्ध करी श्रीमंत करी. त्यासना काळमा त्यासना पुस्तके कितला लोकेसनी इकत लिदात? त्यावर त्यासले रॉयल्टी कितली भेटनी? एक बी नही पण त्यासनी मराठीना पाया रचा यनाथुन मोठी रायल्टी दुसरी कोणती से?*
जे ज्ञानेश्वर तुकाराम यासनी कर तेज अहिराणी सारस्वतासना पहिली पिढीले करन से. अहिराणी साहित्य लिखी ठेवा. आपला जमाना खूप विकसित व्हयल से आपले ज्ञानेश्वर तुकाराम सारख हस्त लिखित लिखी ठेवानी गरज नही. सावटा पुस्तके छापात ते चांगलं. कमी लोक इकत लिथिन जास्ती लोक फुकट लिथिन. तुमले वाटत व्हई का आम्ही फुकट पुस्तके कसाले वाटूत? ते त्यासनी फक्त 50 पुस्तके छापा. 5 पुस्तके आम्ही इकत लिसुत. त्या अहिराणी अकॅडमीमा ठेवसुत. बाकी ईकी द्या नही इकायनात ते सगासाईमा वाटी द्या, नी 5 पुस्तके घरमा संग्रेव करी ठेवा. तुमना वंशज लोकेसले सांगथीन आमना आजा पंजा नी पहिला अहिराणी पुस्तके लिखात. हाई पुस्तकना पुरावा ल्या. याथुन मोठा नफा कोणता से. पैसा सरी जातस पन कीर्ती वाढतं जास.
मंडळी काही लोक पुस्तक इकत लेतत नही, त्यांनी कुडापा करत बठतस. आपला लोक पुस्तके इकत लेतत नही त्यामा नवाई काय से बरं? हाऊ आनुभव तुमले, माले सर्वासले से. लोक पुस्तक इकत लेतत नही म्हणीसनी आपुन पुस्तकज लिखो नही का? आस करू नका जे जमी ते लिखत ऱ्हावा. काहिज लिखता ऊन नही ते पोर-पोऱ्यानी लगन पत्रिका अहिरानामा लिखा ती बी आपला माय अहिराणीनी सेवा से.
अहिराणीमा खूप चांगला लेखक सेत. त्यासना डोकामा खूप चांगल्या चांगल्या कथा कल्पना, कादंबऱ्या, कविता, पवाडा, नाटक सेत. पण हाई बठ कागदवर उताराले जोयजेल मंडई. लोक पुस्तक इकत लेतत नही मंग काय करू पुस्तक छापीसनी? हाऊ ईचारी चूक से. लोक आपलं पुस्तक इकत लेवोत नही ते नको लेवोत. लोकेसनी पुस्तक इकत लेन हाऊ तिसरा फायदा से. पण त्यानाथुन जास्ती किंमतवान फायदा दोन सेत.
1 ) पहिला फायदा तुमना पुस्तकमुये अहिराणी मायना साहित्य संपत्तीमा भर पडी. अहिराणी पुस्तकेसना साठा वाढी. माय अहिराणींना आरस्तोल गुच्छमा तुमन एक पुस्तक रुपी फुल ऱ्हाई.
2 ) दुसरा फायदा असा 🌝चांद 🌞सुऱ्या जित्ता सेत तवलोंग अहिराणी भाषा जित्ती ऱ्हाई नी अहिराणी जित्ती से तवलोंग तुमन पुस्तक नी त्या पुस्तकवरनं तुमन नाव नी फोटुक कायम ऱ्हाई. मराठीमा म्हण से दखा,
" मरावे परी कीर्ती रुपी जगावे। "
या दोन फायदा महत्वाना सेत. त्यांना करता पुस्तक लिखा.
3 ) तिसरा फायदा म्हणजे लोके आपला पुस्तके इकत लिथन यामा दोन पैसा नफा भेटी नही ते कमीत कमी छपाईना खर्च तरी वसूल व्हई. पन हाऊ फायदा तितला महत्वांना नही. कोणी आपलं पुस्तक इकत लिद तरी सलबात, नही लिद तरी सलबात से. तिसरा फायदाना इचारज करू नका.
मराठी, हिंदी नी बाकी बठ्या भाषांना वाचक वर्ग सेत. नी त्या त्या भाषामा त्या त्या लेखक दर साल हजारो पुस्तके छापतस त्यामा एखादं पुस्तक नवाजास. मृत्युंज, छावा, पानिपत, झुंज, आमचा बाप, ययाती, जाणता राजा असा कितला पुस्तके सेत ज्या लोक पैसा दिसन इकत लेतस. हजारमा एक पुस्तक ऱ्हास. म्हणीसनी 999 लोक पुस्तक लिखान सोडी देतस का? नही. मराठी लेखकसनी हाई गत्या से तठे आपला नवोदित लेखकसना कोठे गुदारा लागावं से?
खरं सांगू मंडई अहिराणी साहित्यिकासना वाचक वर्गज नही से अजून. मूळ म्हणजे आपला लोकेसले वाचनी तितली आवड नही. त्यामा tv मुळे चांगला चांगला वाचकसन वाचन कमी व्हई जायल से. अहिराणीले ते वाचकज नही! अहिराणींना वाचक बी नही नी प्रेक्षक बी नही तरी निव्वय अहिराणीना पिरिम मुळे काही लोक लाखो रुप्या खर्च करतस नी अहिराणी सिनमा काढतस. आपले ते पुरा हायातीमा निस्ता 10/15 हजार रुप्या आपला पुस्तकवर अहिराणी माय करता खर्च करात, ते त्यामा काय एवढं नुकसान से?
अहिराणी प्रेक्षक नही हाई माले म्हाइत से, तरी मी एक मोठं व्यावसायिक नाटक, *तंगा मंगाना दंगा* स्टेजवर लै ऱ्हायनु. त्यावर आते लोंग एक लाख रुप्या खर्च व्हयल सेत. आजून खुप मोठा खर्च करना पडाव से. अहिराणी प्रेक्षक नही से तो मी घडवूसु यांनी खात्री नी अहिराणी प्रेम यामुळे मी हाई हिम्मत करी ऱ्हायनु!
*अहिराणी बोला, वाचा, लिखा!*
*अहिर तितला जुगाडो। अहीर धर्म जगाडो।।*
* श्री बापूसाहेब हटकर
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ.
📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा