अहिरानी वाचाडासाठे काय कराले जोयजे ? लेख - माननीय लतिकाताई चौधरी, दोंडाईचा


************************************
1) बोलीभाषा -
भाषा/बोलीभाषा म्हंजी काय?
 भाष म्हंजी बोल, बोली.भाषित म्हंजी बोललं वाक्य, वचन.भाषिक म्हंजी बोलणारा. याना आर्थ जी बोलास ती बोलीभाषा. लोकजीवनना सबद वापरी विचार विनिमय व्हस ती बोलीभाषा. बोलीभाषा हाई दर 12 कोसवर बदलत जास. कारण परिवर्तन हाऊ भाषाना गुणधर्म शे. अहिरानीभाषा  हाई न्यारा न्यारा पध्दतथीन बोलास. त्यामा वापरेल सबद या कोणती भाषाना शब्दसंग्रहमा सापडथिन आशी नई. भौगोलिक प्रांत,परिसर जसा जसा बदलत जास तशी-तशी अहिरानी भाषा बोलानी पध्दत म्हंजी बोलानी लय, ढब, रेल, आघात बदलत जातस. भौगोलिक परिसरनुसार नंदुरबार, धूयं, जयगाव, नाशिकना कयवन, मालेगांव, सटाना,
चांदवड तालुकामा अहिरानी भाषा न्यारी न्यारी ढबमा बोलतस. त्यावरथुन नंदूरबारी, बागलानी, खाल्यांगी,वर्ल्यांगी अहिरानी आसा परकार (प्रकार)पडतस. औरंगाबादना कन्नड तालुकाना काही भागमाबी अहिरानी बोलतस. पन खान्देशनी मुख्य भाषा अहिरानी शे. जवयपास ९० % लोके अहिरानी भाषा बोलतस. तिन्ही संकल्पना विशाल शे. आख्खा जगमा ६५०० भाषा बोलातीस . भारत देसमा १२२ मुख्य भाषा, आनी १५९९ इतर बोलीभाषा बोलतस. महाराष्ट्रमा एकूण ६० भाषा बोलातीस.दुर्दैव आसं शे का विज्ञान, तंत्रज्ञान मोबाईल, कम्प्युटर, शिक्षण, प्रगतीना कायमा ४९ बोलीभाषा मृत्युपंथकडे लागेल शेतीस.  खान्देशनी मायबोली अहिरानी, तिन्हं महत्व, भाषानी गरज आज जास्त शे.

2 ) खान्देशी वैभव-
* खान्देशना सण - आखाजी ,दिवाई, भाऊबीज, लाखीपुनी, कानबाईना रोट, घट, भालदेव, दहीहांडी , दसरा,नवरात्र,पोया......

* खान्देशी देवदेवता- कानबाई,गुलाबाई ( भुलाबाई ) गौराई, गणपती आसरा, म्हसोबा, मुंज्या, घाटा, भगत ........

* खान्देशी व्रते - हरितालिका, ऋषीपंचमी , शिळासप्तमी, वटपौर्णिमा (वडसायित्रीपुनी)

* खान्देशी व्यवसाय - शेती ,गुरे ढोरे ,बकऱ्या, मेंढ्या पालन ,दूध व्यवसाय या फकत आनी फक्त खान्देसमाज व्हनाऱ्या गोष्टी शेतीस.
आते जग, जगनं ,आशा,सपने ,महत्वकांक्षा बदलत चालन्यात. शिक्षण ल्हीसन पोरे खेतीमा, माटीमा, शेनमूतमा, धसे-धसकटे, काटा-पेटा , ऊनमानं जगनं सोडीसन इंजिनिअर ( इंजिनर ) डाक्टर, वकील , मास्तर बनी सुख सावलीन जगनं स्विकारी रायनात. त्याना परिनाम आसा की सन- सरावदनं महत्व कमी व्हयी गे. परदेशी फॅसन
मा ऱ्हानं पसंद करतस. खान्देशी पेहराव, भाषा, वर्तन , संस्कार बदली ग्यात हाई मनले दुख व्हस.              

* 3 ) खान्देशी रीतिरिवाज -
आज खेडामाबी सयरनं वारं लागी गयं. खेडानी रीतरयनी ,खानपान इसरी सयरनी ,परदेसनी, टीव्हीमान्या मालिका देखी देखी बठ्ठं बदलाना वाटवर शे. नेसनं पंघरनं बदली गे. सरम सक्या नई रायनी.वडीलधाडाना धाक ,मानपान, सन्मानआदर इसरी चालनात ,गुरू (मास्तर) ना धाक, आदर रायना नई.

4 ) खान्देशी आखाजीना गाना, गौराईना गाना, कानबाईना गाना , गुलाबाईना गाना , लगीनना गानासवर 8 दिन पयले नाचगाना ,वराडनी, मुराई, हायदना , दामेंडा, बे माथनी, मांडो, देव वरनाना गाना, बिद मीरावनं बठ्ठ्या मोलन्या रीती पद्धती बंद व्हयी ग्यात. गानासन्या शिड्या वाजाडी प्रसंग साजरा करी लेतस.

5 ) आपलं खान्देसनं वैभव टिकाडानं
आपलं नैतिक कर्तव्य, जबाबदारी शे.
आपली अहिरानी भाषा हाई खान्देशी परंपरा ,सन, व्रते, रीतिरिवाज, गाना,घट्यावरन्या ओव्या,भगतन्या वह्या, ( एव्हढंज नई ते गाया  ) हाई बठ्ठं आपली खान्देशी माय माऊलींनी मुखोद्गत म्हनी जित्त्या ठेएल शेत.हाऊ खान्देशी साठा,धन, जगानं तत्वज्ञान सांगणारी, म्हनी ,वाक्प्रचार यामाईन संस्कार देनारी माऊली माय अहिरानीना प्रचार ,प्रसार करानं काम आपलं शे. शिक्षन, फॅसन ,टीव्ही ,सिनेमामुये बोलानी पद्धत बदली गयी.
घटयावर दयाना गाना(ओव्या) , म्हणी , वाक्प्रचार बठ्ठ बंद व्हयी गये. आजनी माय पोरेसले मराठी सायमा धाडनं सोडी इंग्रजी सायमा धाडस. ती बी इंग्रजी सबदे बोलस. अहिरानी बोलानी लाज वाटस. अहिरानी आडानी लोकसनी भाषा म्हनी दूर पडी रायनी.

* 6 ) अहिरानी वाचाडासाठे काय कराले पायजे ?
आपला खान्देसनं वैभव टिकाडानं आपलं नैतिक कर्तव्य, जबाबदारी शे. आपली अहिरानी भाषा हाई समृद्ध भाषा शे. हाई भाषा ,खान्देशी परंपरा, सन, व्रते, म्हनी, गाना, ओव्या, वह्या, गाया ह्या आपल्या खान्देशी माय माऊलींनी मुखोद्गत म्हनी
जिवंत ठेएल शेतीस. अहिरानी भाषामाना 
वाक्प्रचार अर्थघन शेतस. अहिरानी हाई देववानी शे. जगानं तत्वज्ञान शिकाडणारी ,चालीरीती, संस्कार देनारी माय अहिरानी आपुन बठ्ठासनी जोगे ईसन ,इचार करी,नियोजन करी तिना प्रचार,प्रसार करानं आपलं काम शे.

* अहिरानी बोला -
आधुनिकता नाकरानी नई पन आपली माय अहिरानीले कोपरामाबी ठेवानं नई. अहिरानी बोलानी लाज न वाटू देता आभिमान ,गर्वथिन बोलाले जोयजे. आपुन बोलसुत तवय घरमना पोरे बोलथीन. सायमा मराठी ,इंगरजी बोला पन संवाद अहिरानीमा करा .

*यासाठे सायमा आते जश्या इंग्रजी, संस्कृत शे ,तशा अहिरानी भाषाना किमान खान्देशमा तरी एक विषय जोयजे. सायमा अभ्यासले भाषा लागनी ते पोरेसले लाज वाटावं नई.

* ज्या मास्तरसले अहिरानी बोलाना कमीपना वाटस त्यासले अहिरानी बोलनं भाग पडी. अहिरानीना अभिमान वाटी.

* अहिरानी लिखा,पुस्तके काढा-
अहिरानी बोलनार ,लिखानार लेखकसले आत्तेबी बराज प्राध्यापक ,शिक्षक कमी लेखतस, दुर्लक्ष करतस,हासतस त्यासनी अहिरानी लिखानारना आदर,सन्मान कराले जोयजे.

*लिखेल पुस्तकेसले पुरस्कार-
आत्ते मन्हा सहित बराज लेखकसनी ,कविसनी अहिरानी कवितासंग्रह, ललीतलेखन लिखी पुस्तके काढात त्यासना सन्मान व्हयी पुरस्कार योजना सुरू करी ते लिखानारसनी संख्या वाढी. जे लिखाएल शे त्यानी किंमत व्हयनी ते भाषाना किंमत वाढी.
भेदभाव श, आपला परका न करता, साहित्यिक राजकारन न करता                अभ्यासक्रममा साहित्य ल्ह्या. अभ्यासक्रममा साहित्य उनं ते वाचानी संख्या वाढी.

* आम्ही लिखानार लोके जीवतोडी ,पदरगाठ मोडी, तोंडना घास बाजूले ठी पुस्तके काढतंस, मोठा जेठा ,अभ्यासू लोके म्हनी तुम्हले पैसा खर्ची पुस्तके वाट लावंतस त्या तुम्ही कचरानी गत उख्खलानीगत बाजूले फेकी देतस. तुमले धाडेल पुस्तके टाइम काढी, जीव लाई वाची ते देखा, त्याशिवाय त्यामा खान्देशना काय खजिना,डबोलं दपेल शे हाई कसं समजी ?

7 ) साहित्यसंमेलन -
खास अहिरानी साहित्य संमेलन व्हयी रायनात . त्या कोनी अहिरानी मायले खांदावर ली करतस, कोनी भागबल्ली मायना खांदावर बशी गल्ला भरतस. तशीबी व्हयनं तरी अहिरानीना प्रचार व्हयी रायना.
संमेलन खर्च शासननी देवाकरता जबाबदार लोकेसनी प्रयत्न करात ते आखो उत्साह वाढी हेतू साध्य व्हयी.

8 ) खास अहिरानी पुस्तक ग्रंथालय-
खान्देशना च्यारी जिल्हामा-नंदुरबार,
धुयं, जयगाव,नाशिकमा ग्रंथालय करता जागा,हॉल,पुस्तके इकत ल्हीसन ठेवानी जबाबदारी शासननी लेवा करता जबाबदार मंडईनी प्रयत्न  कराले जोयजे.  ज्या लेखक खरोखर खान्देशी रीतिरिवाज, परंपरा, व्यवसाय, शेती भातीवर दर्जेदार लिखानारा लेखकसले पुस्तक प्रकाशनकरता शासननी आर्थिक मदत देवाले जोयजे. त्यावर साहित्यिक राजकारन दूर ठी प्रामाणिकपणे साहित्यनी निवड करनार लोके जोयजेत.
नई ते अहिरानीना बजारभरानी शक्यता वाढी.

9 ) साहित्यसंमेलनमा 
खान्देशी परंपरा जपणारा गाना, म्हनी, उखाना यासनी स्पर्धा ठेवाले जोयजे. मन्हा मतवर नुसतं निबंध म्हनी नई ते तुमना कडे आर्ज (अर्ज विनंती) म्हनी इचार व्हयी .व वर उल्लेख करेल अपेक्षा पुऱ्या कराकरता प्रयत्न व्ह्तीन आशी आशा करस.

जय अहिरानी, जय खान्देश !

     लतिका चौधरी
मु.पो.दोंडाईचा, ता.सिंदखेडा,
जि. धुळे.(पिन-425408)
9326656059/ 7841917198

टिप्पण्या

  1. सांगोपांग ,अभ्यास पूर्ण लेख से.आजू बारकाईनं लिखा ताईसो.. शुभेच्छा..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय - कवी पी पी पाटील

आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी

अमयनेर संमेलन नी कहा गोट

तापी थायनेरमा घुरमयनी! - बापूसाहेब हटकर, अहिरानी साहित्यिक