* आम्ही जल रंग तापीची लेकरं ! *

🎭✌🏻🏆✌🏻💃🏻✌🏻🎭✌🏻🏆✌🏻💃🏻✌🏻🎭
               *आम्ही जल रंग तापीची लेकरं!*
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
              तापी ही अहिर खान्देशची जीवन वाहिनी आहे. जिथे जिथे अहिराणी मुलुख आहे, त्या त्या ठिकाणाचे पावसाचे सर्व पाणी तापी नदीच्या पोटात सामावले जाते. हे पाणी म्हणजे खान्देशच्या विविध भागातील रंग आहेत.. त्या तापीच्या अमृत तुल्य जलांचे भाषिक, सांस्कृतिक, कला, नृत्य संगीत हे सर्व अविष्कार घेऊन उदयाला आलेली नाट्य संस्था म्हणजे, *जल रंग तापी* या जल रंग तापी संस्थेने, 28 मेलां धुळ्यात राजर्षी छ शाहू नाट्य गृहात *तंगा मंगाना दंगा* हे अहिराणी लोकनाट्य सादर केले. त्यात अहिराणी सोबतच खान्देशातील ईतर बोली, भिलाऊ, गुजरी आणि गोरबंजारा या भाषाही वापरण्यात आल्या आहेत.
        गण गवळण आणि वग या माध्यातून सादर होणार हे लोकनाट्य आहे. याचं लिखान मी स्वतः केलं आहें तर मनोहर खैरणार यांनी उत्तम दिग्दर्शन केले आहें. खान्देशातील भालदेव हे गणपतीच रूप आहे. तेच भालदेव रूप घेऊन आपण गण तयार केला आहे. नंतर गवळण आहें. पारंपारीक लोकनाट्यात श्रीकृष्णाच्या लिला दाखविण्यात येतात त्यात बहुदा कृष्णच्या खोडीच जास्त असतात. त्याला बगल देत,आपण आमळी ता साक्री येथे कन्हैयालाल महाराज यांची कथा सादर केली. या मंदिरात श्री विष्णुची काळ्या दगडात कोरलेली सुंदर मूर्ती आहें. बेंबीतून कमळ बाहेर आलं आहें. त्यावर ब्रह्मदेव विराजमान आहें. बेंबीतूनच एक सूक्ष्म पाण्याची धार दिसते, ती कान नदी. कान्हाची मानस कन्या ती कान नदी असा तें नावं आहें. तिथून ती गुप्त होऊन पुढे बऱ्याच अंतरावर दृश्य स्वरूपात उगम पावते.
        या मूर्तीची आख्यायिका अशी आहें कीं, ती मूर्ती द्वारकाधीश मंदिरातील मुळं मूर्ती आहें. ती मूर्ती खान्देशात आमळीला कशी आली हीं कथा त्यात आहें. हीं गवळण संपल्यावर मुख्य कथानक सुरु होते.
              त्यात खान्देशी संस्कृती दाखविली आहें. सुरवातीलाच शाळा दिसते. त्यात मुलं पूर्वीचे खान्देशी खेळ खेळताना दिसतात. पत्ते, गोट्या, भवरे. मुली फुगडी खेळतात. त्या दिवशी शाळेत 15 ऑगस्ट असतो. तिथे गावचा सरपंच, तंगाजीराव पाटील आणि उपसरपंच मंगलसिंग गिरासे यांचा वाद उफाळून येतो आणि मग गावात संघर्ष सुरु होतो. त्यात गावातील इरसाल गावकरी आगीत तेल ओतत असतात आणि मग सुरु होतें एक जीवघेणी स्पर्धा. एक विनोदी महानाट्य, त्यात तीन तास कसे निघून जातात हे प्रेक्षकांना कळत सुद्धा नाही. या नाटकात स्टेज वर एकुण 24 कलाकार वावारतात. प्रत्येक नट त्याच्या जागेवर, बाप माणूस आहें. हीं एक उत्तम नटांची उत्तम भट्टी जमून गेली आहें. यातील संगीत, नाटकाला साजेस आहें. शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या तालमित तयार झालेली दोन मुलं भागवत महाजन आणि कुणाल राऊत या जोड गोळीनं सांगिताचा साज चढवीला आहें. हीं मुलं पुढे जाऊन खूप मोठी होतील. या पोरांना मी संगीतकर, *रावळ्या- जावळ्या* हे नावं देणार आहें. त्याना पेटी मास्तर मोरे यांची उत्तम साथ मिळाली आहें. पुरुष गायकाची बाजू स्वतः शाहीर शिवाजीराव पाटील सह भागवत महाजन आणि भूषण पवार यांनी सांभाळली तर, स्त्री गायक कलाकार भाग्यश्री पाटील आणि संगीता माळी यांनी गोड गाणी म्हटली. त्यात एक गवळण आणि तीन अहिराणी लावण्या आहेत.
         यात नर्तनाची बाजूही भक्कम आहें. प्रीती मिश्रा यांनी रूपाली तांदूळकर आणि समीक्षा मुंडे यांच्या कडून नृत्य छान बसवून घेतली. ईतर प्रत्येक जन आपलं काम मस्त करून प्रेक्षकांच्या मनात घर करतोय. त्या इरसाल नमुन्याची नामावली पहा, प्रशांत महाजन, भटू चौधरी, शां शिवाजीराव पाटील, सुरेश अंतुर्लीकर, भारत पवार, निलेश जोशी, कुणाल शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, सौरभ राठोड, संजय विसपुते, भूषण कुंभार, अक्षय शिंदे, किरण चौधरी, प्रीती मिश्रा, संगिता माळी, अस्मिता पाटील, भाग्यश्री पाटील, रूपाली तांदूळकर, समीक्षा मुंडे, भागवत महाजन, कुणाल राऊत, मोरे मास्तर, भूषण पवार.
           *लोक रंजनासाठी हे नाटक  पूर्णपणे काल्पनिक लिहिले आहें. यातली पात्र काल्पनिक आहेत. नावं काल्पनिक आहेत. घटना काल्पनिक आहें. पण समजा, जर एखाद्या प्रेक्षकाला वाटलं कीं, हीं तर माझ्या गावातील कथा आहें. तर तें माझं आणि मनोहर आण्णा आमचं सक्सेस असेल!.*
🎭✌🏻🙏🏻🏆🎭 बापूं हटकर
🎭✌🏻🏆✌🏻💃🏻✌🏻🎭✌🏻🏆✌🏻💃🏻✌🏻🎭

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय - कवी पी पी पाटील

अमयनेर संमेलन नी कहा गोट

आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी

भारतीय ग्रामीण संस्कृतीदर्शन, ग्रामीण जीवन युद्धाचा आणि नात्यांचा सुंदर गोफ - गल्लीनी भाऊबंदकी