राज्यस्तरीय अहिरानी युवा कवी संमेलन नाशिक
*अध्यक्षीय मनोगत*
*पहिले ते मी या माय माऊली ले नमन करस ! सौ. सुनिता अक्का पदरमोड करनारी अहिरानी मायनी लाडकी आंडेर शे. गणकच आयोजनं अहिरानीना गुंता हुयी रायनात, नानासाहेबस्ना बबल्या ना शबदम्हान सांगानं झायते बुढ्ढीना बालवर फुगा इकनारस्नी कमी नही. पन ताई जेठा-मोठा साहित्यिक पाशीन महिला, युवा लगून बठ्ठास्ले एक मांडोम्हान लयीसन त्यास्ले मानपान आहेर देवाना हाऊ वसा अक्कानी हाते लेल शे. आपला मे महिना ना पगार आपले भेटनाच नहीं आसं समजीसन या माऊली अहिरानी साहित्यकार आनी त्यास्ना लेखनीले प्रेरीत करानं मोल नं काम सुरू करेल शे. मी मन पशीन आरस्तोल करस खान्देश हित संग्रामना मेढ्या आदरणीय भैय्यासाहेब पाटील, प्रवक्ता नानासाहेब सुरेश पाटील, आनी बठ्ठा पदाधिकारीस्ना. ज्यास्नी मन्हा सारखा अहिरानी मायनी पालखी छोटा भोयीले इतला जेठामोठा टिलकचंद लोकेस्मा बठाडी दिन्हं.
स्वागताध्यक्ष गणेश पाटील, उद्घाटक ज्ञानेश्वर भामरे कवी संमेलन ना मेढ्या गझलकार शरद धनगर खान्देश मराठा मंडळनं कार्यकुशल नेतृत्व आदरणीय प्राचार्य प्रशांत पाटील, अर्पण शेवा फाउंडेशन ना मेढ्या आदरणीय संग्रामसिंह राणा, २ रं विश्व अहिरानी साहित्य संमेलन ना अध्यक्ष जेठा साहित्यिक डॉ. एस.के पाटील, प्रा. सुमती ताई पवार शेत. खान्देश वाहिनी ना संचालक आम्हना भाचा समाधान भाऊ सोनवणे शे. आठे संमेलन भारी करासाठे झटनारा बठ्ठा जिवलग मैतरस्ना बी गयरा आभारी शे. बठ्ठास्ले रामराम आणि महिला बघीनीस्ले सितासिता.
जवय सौ. सुनिता आक्काना फोन उना म्हणे, ‘ रमेश भाऊ तुल्हे अहिरानी कवी संमेलन ना अध्यक्ष व्हवानं शे. तवय मी थोडा भेमकाई गवू. की इतलं चांगलं-चांगलं लिखनारा अहिरानी मायना आंडरो सोडीसन मन्हासारखा कार्यकर्ताले मेढ्या करवो, हाऊ इचारच माल्हे चौकट बाहेर ना इचार वाटना. आपण अहिराणी साठे काय कयं ? आसा प्रश्न पडना. आनी मंग उत्तर सापडनं की, मी ज्या अहिरानी मायनं गयरं मोठं काम करणारा पन बीन चेहरास्ना साहित्यीकारस्ले चेहरा दिन्हा. त्यास्नं काम उजाया म्हान आनं. समाज माध्यमंना वापर करीसन त्यास्नी फेसबुकवरथून वयख-पायख करी दिन्ही. जवळपास शंभर साहित्यिक जोडात. त्यास्ना इचार, अभ्यास, त्याग लोकेस्नी जानी लिन्हा. ज्या जेठा साहित्यिक शेतस त्यास्नी या उपक्रम मझार कोनताच आढायेढा नं लेता व्हकारा भरा. खान्देश ना बठ्ठास्नी हाऊ उपक्रम कोरोना कायम्हा डोकावर लिनथा यान्ही एक यादगीरी उनी आनी वाटनं हायीच आपली काम नी पावती म्हनीसन आपले ताईनी मेढ्या बनाडं हुयी.
ताई म्हणे युवा कवी संमेलन ले टॅगलाइन सांगा, मन्ही लिखी धाडं….
‘नवा दमनी, नवी प्रतिभा,
नवी लेखनी, नवी प्रतिमा‘
मी आठे तुम्हन्हा प्रतिनिधी म्हनीसन बठेल शे. आठलोंग येनं म्हणजे थोडासा गम खानं आनी कामम्हा रमी जानं. सिंहस्थ नगर ना कवी नारायण सुर्वे कट्टा ना याच हॉलम्हान मी एक कवी म्हनीसन कविता वाचन कयं. याच हॉल मझार मी सुत्रसंचलन कराले ऊनू, याच हॉल मझार माल्हे खान्देश भूषण पुरस्कार बी भेटना, आनी याच हॉल मझार मी आज सौ. सुनिता अक्का ना आग्रो खातर संमेलन ना मेढ्या म्हनीसन मी हाजीर रायनू. हायी कवितानं संमेलन शे. कविता लिखनं खरं म्हणजे गयराच गंभीर विषय शे. संस्कृत भाषा मझार “वाक्यं रसात्मकं काव्यं“ आशी व्याख्या करेल शे. मंग आठे रसपूर्ण वाक्यं ज्याल्हे-ज्याल्हे लिखता यीन तो तो कवी. पण या व्याख्यास्ना बाहेर इचार करा तर उत्कट अनुभव नी यथायोग्य मांडणी म्हणजे कविता, आसं म्हनं तरी चाली. आनी सोपी भाषाम्हान व्यक्त होनं हायीच गयरी मोठी गोट शे. आजना युवा प्रगल्भ शे. त्यानी समज बी दांडगी शे. तो भटगी गया वैगरे-वैगरे मी काही मान्य करत नही. युवक नी सकारात्मकता फक्त वाढे लावानी गरज मातर शे. त्याल्हे साहित्य प्रकार, शैली, मांडनी नं योग्य तंतर माहित झायं तो मोठी मजल मारू शकी. या जुवान कवीस्ले फक्त अहिरानी बोली नं लोकगीते, गाणांस्नं मोल सांगनं पडी. कवी निंबा, कवी कमलनयन यास्नी अहिरानी भाषा नी पोथी लिखेल शे. वही लिखनारा चांगसुलतान हाऊ कवी तांदुळवाडी ना व्हता. काव्यमय लोककथा सांगनारा गोठाड्या ( गपुडा ) आपलाकडे व्हयी गयात. काम करता करता काव्यं निर्मान करनारा आपलाकडे हुयी गयात. मोठा लोकसाहित्य नं डबोलं आपल्याकडे शे. त्यान्ही मांडनी लय आपले मार्गदर्शक शे.
*युवा आनी अहिरानी कविता* –
आपलं लोकसाहित्य आणि परंपरा सण, उच्छाव नी महानता शे. यान्हाबाहेर जावानी आजना युवा कवीनी गरज शे. पन यान्हा आर्थ आपली परंपरा कालबाह्य शे आसं बी नही. त्यान्ही प्रतिमा आपला लेखन म्हाइन येनं बी गरजनं शे. आलिस डेफ्लोरीयन सारखी २३ वरीस नी पोर आपला इटली देसम्युहाइन जर्मनी देश मझार जाइसन एम ए करस आणि भारत म्हा इसन. खान्देशी संस्कृती आणि बोली भाषा ना अभ्यास करस. मंग आपलं बी काम शे माय बोलीसाठे काही योगदान देवानं . आज काय करू शकतस ? आज अहिरानीना ज्या साहित्य प्रकार कमी लिखायेल शेत त्यान्हं लिखान सुरू करू शकतस, जसं की, नाटक, चरीत्रलेखन, भाषांतर अनुवाद, इ. आनखीन लोकगीतेस्मान्हा व्यक्ती चरीत्रस्नी माहिती शोधू शकतस. छोटा-मोठा साहित्यिक ग्रंथना अनुवाद करू शकतस. राष्ट्रपुरूषस्नं चरीत्र अहिरानी मझार भाषांतरीत करू शकतस. नुसतंच संकलन आते नको. माल्हे माहिती शे आते प्रत्येक जन युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवर शे. याच समाजमाध्यमेस्वर तुम्ही आपला इतिहास, संस्कृती, पर्यटन विकास, खान्देश ना प्रश्न यावर लिखाले जोएजे. राजकारणले डबकं म्हनीसन चालनार नही. त्यान्ही रंगरूप बदलवनारं लिखान येऊ द्या. आसं लिखनारा नानासाहेब सुरेश पाटील, कल्याण, श्री बापूसाहेब हटकर, बदलापूर या सारखी मंडळी शे. कला आनी कौशल्य हायी आजनी युवा पीढीले तारू शकस कारण गाडगेबाबा आसं म्हणतस ‘कला असे मानवासी भूषण‘ किमान एक तरी कला, कौशल्य आत्मसात करा. आते पुस्तकं वाची डीगरी लीसन नौकरी नही. आते लेखनी बरोबर भविष्यानी आखनी बी गरजनी शे. त्यान्हा साठे आपली तयारी गरज नी शे. आपला या संमेलनले हातभार लावनारा युवा कवी गणेश पाटील, कवी प्रवीण पवार यास्नं लेखन बी दमदार शे. प्रवीण पवार ना कव्यसंग्रो प्रकाशित शेत. हाऊ कवी वाघरी बोली नं शिमला जायीसन प्रतिनिधित्व करी येल शे.
*अहिरानी बोली भाषा, कविता आणि साहित्यकार*
मंडई, आपली अहिरानी भाषाना गयरा मोठा इत्यास शे. काही आध्यात्मिक संदर्भ बी सापडतस ज्ञानेसरी सारखा ग्रंथम्हान बराच बागलानी अहिरनीना ओळी शबद येल शेतस…”यशोदेना बाय तान्हा माले म्हणे हायी लेवो, मी ते बाई साधी भोयी गवू त्यान्हा जवयी येयीसन बिलगना फाडी मन्ही चोयी“ हाय गवळन अहिरानी शे. अभीर जनसमुदाय नी ती भाषा शे. महाभारत ना कायपाशीन शे आसं म्हता यीन. अहिराणी गाणास्नी मौखिक परंपरा जुनी शे. कानबाई, गुलाबाई, गवराई, आखाजीना, लगीन ना गाणां मरन धरनना विरह गाणां आसं बरच शे. पन आते यान्हा पुढे जावान गरज शे. अहिरानीनी लिखनारस्नी चयवय गयरी जुनी शे. दा.गो. बोरसे यास्नी १९५३ म्हा खान्देश मंडळ नी स्थापना करी. अहिरानी संवर्धन ना वसा हाते लेल व्हता. आते दमदार लिखनारा काही कवी आपन जरूर वाचू शकतस. श्री. सुभाष अहिरे, नामदेव महाजन, प्रकाश पाटील, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, डॉ. वाल्मिक अहिरे, सुनील गायकवाड, प्रा. विमलताई वाणी, लतिकाताई चौधरी, नानाभाऊ माळी प्रा बी एन चौधरी, मोहन पाटील, शरद धनगर वि ना बागुल, विजय निकम, वेदराज कपाटे अशी बरीच मार्गदर्शक कवीस्नी आते मांदियाळी आपला समोर शे. अहिरानी लेखनले दरजा प्राप्त हुयी आसं लिखानी मोठी जबाबदारी आते आपलावर शे. आपलं लोकसाहित्य सकस शे. पन आते आपले बी त्या दर्जानं लिखनं पडी. लोकसाहित्य संकलन संशोधन मझार जेठा साहित्यिक कृष्णा पाटील, डॉ. उषा सावंत, डॉ मी सु पगारे, डॉ बापुराव देसाई यास्नं काम शे. अहिरानी कोश, व्याकरण लेखन करणारे एकमेव साहित्यिक डॉ. रमेश सूर्यवंशी, कन्नड यास्नं काम भरीव आनी मार्गदर्शक शे. कथाम्हान संजीव गिरासे, मोहनदास भामरे, पी. पी. पाटील, कादंबरीम्हान बापूराव देसाई, गोकुळ बागुल, ललित मझार लतिका चौधरी, ज्ञानेश्वर भामरे, नानाभाऊ माळी, नाटक मझार बापूसाहेब हटकर, अशोक चौधरी, समीक्षा लिखणारा डॉ. फुला बागुल ( खारं आलनं ) शाहिरी काव्य लिखनारा शाहिर शिवाजीराव पाटील, नाना पाटील खेडीकर, शिनेमा, पटकथा मझार, ईश्वर माळी, अशोक चौधरी, अहिरानी सदर चालवणारा रमेश बोरसे, खलिल देशमुख, अशोक सोनवणे, मासिक चालवणारा डॉ. सुधीर देवरे ( ढोल, अहिराणी आगाजा ) महेश लिला पंडीत ( आखो ) अनुवाद वनश्री पाटील, कमलाकर देसले, आसां काही उदाहरणे आपले सांगता येतीन.
*खान्देश हित संग्राम आणि साहित्यिक, सामाजिक बांधिलकी*–
“आपली भाषा आपली वानी, अहिरानी माय अहिरानी“
“घरेघर संदेश…सोनाना खान्देश !!!! “
हायी भावना लीसन काम करनारी खान्देश हित संग्राम कल्याण हायी संघटना काम करस. अहिरानी भाषा संवर्धन, खान्देशी मानुसले रोजगार, त्यान्हावर व्हनारा अन्याय विरूद्ध लढनारा या ढाण्या वाघस्नी हायी संघटना शे. माननीय श्री. भैय्यासाहेब पाटील, श्री. गणेश पाटील, श्री. कैलास पाटील, श्री. सुरेश पाटील, श्री. शशिकांत पाटील आणि आते या कामले सौ. सुनिता ताई मधुकर पाटील, महिला राज्याध्यक्ष खान्देश हित संग्राम यास्ना भक्कम पाठिंबा शे.
• *आजना युवा प्रेरणा पुरस्कारना मानकरी*
माल्हे आज गयराच आनन हुयी रायना. कारण काय ते एक मायना लाल जो आज आपला कठोर परिश्रम ना जोरवर प्राध्यापक झाया. ‘घोडावरला बाप मरो,पन चुल्हावरनी माय ना मरो.’ आसं गंभीर लिखनारा प्रा.तुषार पाटील, लोकमान्य टिळकसारखी मालिकानं लेखन, दिग्दर्शन करनारा, झी मराठी , सोनी मराठी सारख्या वाहिनीसाठे काम करणारा जीवान अमोलभाऊ पाटील, बाल कवीस्ले घडावनारी शिक्षिका, कवयित्री प्रा. शामलताई पाटील, धुळे नवा दमना कथाकार, कवी अमोल शांताराम पाटील, औरंगाबाद, खान्देश मझार ज्या आवाजनी जादू शे. आसां ऊसतोडणी कामगार ते गायक असा प्रवास करणारा आम्हना मैतर भैय्यासाहेब मोरे, मुळ पोहरी चाळीसगाव ना शे, दूसरा मैतर सुत्रसंचलन मिमिक्री आर्टिस्ट अहिराणी - मराठी मालिकास्ना अभिनेता विलास कुमार शिरसाठ अमळनेर पिळोदा ना शेत. या बठठास्ना आरस्तोल मनपशीन आरस्तोल करस.
परत एकदाव खान्देश हित संग्रामना महारथीस्ले मनपशीन धन्यवाद ...! कवी नारायण सुर्वे, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज यासारखा महान लेखकस्नी या नाशिक नगरीम्हान माल्हे माननपान दिन्हं. मन्ही जबाबदारी वाढनी. यान्ही माल्हे जानीव शे. त्यावर खरा उतराना मन्हा नेमी प्रयत्न राही. जेष्ठ कवी सुभाष अहिरे आसं म्हनतस. माय अहिरानी ना पदर फाटू नका दिवू , माय अहिरानी बोलायची लाज वाटू नका दिवू. जय अहिरानी जय खान्देश !
प्रा. रमेश विरभान धनगर
रेशमाई, धनगरवाडा, गिरड
ता.भडगाव,जि.जळगाव– ४२४२०१.
मोबाईल– ८६६८८१४७३४
इमेल – ramesh.dhangar1981@gmail.com
वेबसाईट – Ahiraniboli.in
ऍप्लिकेशन – AhiraniBoli( Play Store वरउपलब्ध)
समाजमाध्यमं–युट्यूब - AHIR BOLI NEWS
फेसबुक – अहिरानी बोली, Ahirani Boli.
इंस्टाग्राम – AhiraniBoli JagarAhiraniMayana ट्विटर – AhiraniBoli
- अल्पपरिचय -
पुर्ण नाव :– श्री. रमेश विरभान धनगर
जन्म तारीख :- २२/०६/१९८१
व्यवसाय :– उच्च माध्यमिक शिक्षक जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
पत्ता :– मु. पो. गिरड ,ता .भडगाव,जि.जळगाव ,पिन-४२४२०१
मोबाईल :– ८६६८८१४७३४, ९४०४३२६५५०
शिक्षण :– एम.ए.बी.एड.- (मराठी – इतिहास) एम.ए.( मास कम्युनिकेशन ॲंड जर्नालिझम)
कोषाध्यक्ष- महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भडगाव
• *उल्लेखनीय –*
• ९० वे डोंबिवली, ९४ वे नाशिक, ९५ वे उद्गीरव, ९६ वे वर्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काव्यवाचन.
• खान्देश हित संग्राम चा युवा खान्देश भूषण पुरस्कार २०२२.
• उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळचा महाकवी कालिदास पुरस्कार २०२२.
• कै. मालतीबाई नामदेव पवार यांच्या स्मरणार्थ साहित्यरत्न पुरस्कार २०२२.
• पहिले अहिर बोली कवी संमेलन नं यशस्वी आयोजन २०२२.
• जवळपास १०० अहिराणी साहित्यिक कलावंत यास्नी अहिरबोली चॅनल मार्फत वयख-पायख .
• *निमंत्रित कवी म्हनीसन निवतं*
• १)मसाप चाळीसगाव आयोजित शिवार साहित्य संमेलन मेहुनबारे.
• २) १ ते ५ आदिवासी अकादमी आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलननं सुत्रसंचलन.
• ३) पुज्य साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालय अमळनेरना निमंत्रित कवी संमेलन मझार सभाग.
• ४) म वा मंडळ अमळनेर ना जिल्हास्तरीय साहित्य संमेलन मझार सभाग
• ५) नगर वाचन मंदीर चोपडा ना निमंत्रित कवी संमेलन मझार काव्य वाचन
• ६) एम 4 मराठी आयोजित जळगाव जिल्हा ना निवडक कवीस्न कवीसंमेलन मझार काव्य वाचन.
• अहिराणी कस्तुरी मंच, पुणे आयोजित पिंगळवाडे आणि पुणे संमेलन मझार काव्यवाचन.
• मसाप चाळीसगाव आयोजित कवयित्री शांताबाई शेळके जन्मशताब्दीनिमित्त आयोजित काव्य गायन संमेलनात सभाग.
• मसाप पाचोरा राज्यस्तरीय बोली संमेलन मझार सभाग आनी सुत्रसंचलन.
*|| जागर अहिरानी मायना ||*
या रे लेकरस्वन तुम्ही जागर कराले
अहिराणी मायनी, पालखी धराले ||
कान्हानी शे वाणी मन्ही, माय अहिराणी
ज्ञानानी बी लिखी ज्ञानेसरीम्हा अहिराणी ||
आरस्तोल करा मायना, व्हा पालखी ना भोयी
लेकरूना साठे तीन्ही, बांधी झावरनी झोयी ||
अहिराणी मायमन्ही, झायी वनवासी
दखीसनी मायले, लोकं देथस हासी ||
हिनथस लोक तिल्हे, करथस परायी
कशीगोड लागे तिन्हा, तोंडनी बी गायी ||
धल्लीपल्ली म्हनी, तिन्हा हाते दिन्ही काठी
घट्यावरनी ओवी म्हान, तिन्ही सांगी जगर्हाटी ||
दखा लेकरस्वन, तिन्ह डबोलं सोनान
धनगोत म्हणे, जूनं तेच र्हास सोनं ||
तिन्हा सणनी उच्छाव, त्या रमुसना गाणा
आयकीस न्सुक्कत लागे, आन्हा नी उखाणा ||
करू नका तुम्ही, हायी मन्ह हायी तुन्ह
फिटाव नहीत तिन्हा, लाख-लाख ऋण ||
कवी रमेश धनगर, गिरड

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा