ढिंढरा खाई ल्या गधडा वाई या 😆
😆😆
—__©MKभामरेबापु
उतरानना दुसरा दिन "कर"..
सक्कायमा खेसरना नाता वाला हांक मारथीन.
त्याले व्हकारा दिना,म्हंजे तो जिकायना.मंग तो म्हनी
ढिंढरा खाई ल्या
गधडा वाई या..
अशी हाई आपली परंपरा से.
खेसरना नाता म्हंजे
देर वैंजी
साला पावना
ननंद भौजाई
मामभाऊ फुईभाऊ.
आसा नाता मा अशा थट्टा मस्करी चालस...
पहिले फोनबीन नही व्हतात.भला पैठामा मंग एराएरले हांका मारेत.आराया मारेत.धीरेज नाव पुकारैत.
मंग कोनी फसना ते मज्या लेयेत,
पन या दिन लोके तोंडमा गुईनी धरी चिडीचुप गिडीगुप र्हातस.
कोनी कितला का हाका मारेना,तोंडमाहीन ओ काढतस नही नि व्हकारा भरतस नही.
आते मोबाईलना जमाना से.आते फोनवर हाई चाली.
"हॅल्लौ" बोलताज,गधडा वायाले जानं पडी.
म्हनीसन आते कोनीज व्हकाराबी देवाव नही नी हॅल्लो बी बोलाव नही.
मंग तो थट्टा करनारा बिचारा सरमाई जाई,नाराज व्हई जाई ना हो मंग.
हाई काही मना भिडस्त सभावले रुचत नही.
दुसरा नाराज ते व्हवाले नही जोईजे,
त्याले आनंद ते भेटालेज जोईजे.
मंग काय करो सालं?
मी मंग बठ्ठास्ले व्हकारा भरसु,
जसं काही माले माहीतीज नही आसं सोंग लीसन मी भोयेभोयैपणे
"औ,काय वैंजी"
"आं बोला पावना"
"काय साली बाई"
"हाॅलो साला भो"
आसा प्रतिसाद देसु.
दखा मंडई,
भले बै आपले कोनी एडाबागा समजो पन समोरनाले जो जिकाना आनंद व्हस ना,तो भलता न्यामी र्हास.
कारन कोनी व्हकारा भरा नही,ते त्यानी बोहनी व्हस नही,नाट बी पुरी व्हस नही..
म्हनीन मी व्हकारा भरीसन सरवास्ले खुस करसु भो.
कोन्ले पटो ना पटो.
आपली रुढी परंपरा बी चाली.
नाता बी घट्ट व्हतीन,
पिरीम बी वाढी.मज्याबी यी,आनंद बी भेटी,
देखा भो मना ऐडाबागानं हाई गनीत सै.
तूमीबी मालै हांका ते मारी देखा हो.
पन त्याना पहिले ढिंढरा धाडाना याद ठेवज्यात हौ.
तुमना ढिंढरा ऊनात आनी मना मोबाईल चालु रायना ते मंग गंमतज गंमत.
मी ढिंढरा खात जासु
गधडा वाई येत जासु,
पण मना मोबाईल बन्द व्हयना ते मंग तुमीज जावो भो गधडा वायाले.
———Mkb😆😆😆😆😆😆

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा