आहीरानी संम्मेलन निवतानी दवंडी ऽऽऽ ——© MK भामरेबापु



आयका हो मंडई आयकाऽऽऽ

आपली मायबोली आहिरानिनं संमेलन धुयामा भरी र्‍हायनं हो ऽऽऽ

२१,२२ जानेवारीले..

बठ्ठास्ले निवतं से.

बठा जन येज्यात होऽऽ ढुम् ढुम् ढुमाक्...ढूम् ढुम् ढुमाक्


समदास्नं संमेलन


६ वं आहिरानी संमेलन धुयामा भरी र्‍हायनं,त्याना करता बठ्ठा आयोजकस्ले मनफाईन शुभेच्छा देस.


आपला खान्देश व माय अहिरानीना लेकरे या साहित्यानी खान शेतस.

एकेक हिरा चारी मेर बसेल सेतस.

मातीमाहीन निंघेल साहित्य म्हणजे जमीनमाहीन निंघेल मोतीस्नं पीकच से.

माय बहीणाई थुन सुरु व्हयेल हाई परंपरा आज वडनं झाड बनीसन पसरेल से.

लेख,कविता,कथा,गझल,पोवाडा,संगीत,गायन,कला,शाहीरी एकथीन एक न्यामी से.

या साहित्य संमेलनमा न्यामी गिरामी कवीस्न्या कविता,

लेख,कथा दिखथींन

भाषातज्ञ आपला मते मांडथीन.

हृदयले भिडणार्‍या कथा आयकाले भेटथीन.

परीसंवाद आयकाले भेटीन.

आपल्या कविता,कला सादर कराले भेटीन.


पुलकीत करणारा पवाडा नि गुदगुल्या करणार्‍या चारोया.

मुक्का मुक्का संवाद बी

नि मोठमोठ्या आरोया बी.


आंसुबी हासुबी

व्हवु बी सासुबी

पल्लो लेयेल देरानी

 नि ठुमकत ठामकत जेठानी बी


दादा बी नाना बी आबाबी

नवतरुन सोबत धल्ला बाबाबी

रुढी बी परंपरा बी

कोढाबी आन्हाबी


घट्यावरना गाना

नि लगीनना आन्हा बी

राहेल सुहेल

खान्देशना बाना बी


नबेदा व्हणार्‍या रुढी

गायब व्हयेल परंपरा

आपली रीतभात

आपला आग्रो

आपली भाषा

आपली बोली

आपली लावणी

आपला तमासा

आपलं भारुड

आपलं गारुड

आपली कानबाई

आपली गवराई

आपला भालदेव

आपली टिप्पनटाई

असा बठ्ठा जागर व्हनार से.

ऊजागर व्हनार से.

म्हनीसन या आने आनंद ल्या

हाई बठ्ठं देखाले ,आयकाले नि अनुभवाले भेटी!

आपल्या लोककथास्मा भारी संदेश दपेल सेतस.

आपला दामेंडा,घट्यावरना गाना,

रुढी परंपरा यास्मा साहित्य दडेल से,

ईतलज नही

मराना टाईमले बाया तोंडझाकी रडतस त्यामाबी काव्य रास.

आपला पोरे भोकाट पसारी रडतस त्यामाबी सुरताल र्‍हातस.

यास्ले व्यासपीठ देवानं महत्वानं काम या संमेलननी साधेल से.

आज न्यारा न्यारा लोके,संस्था,गृप,संघटना याना करता जोरशोरमा काम करी रायनात.

न्यारा न्यारा साहित्य संमेलने भरी रायनात.अहिरानी भाषाले व आपला लेकरेस्ले प्रकाश झोतमा लई रायनात. देश विदेशना माणसे यामा भाग लि रायनात.

हाई आपला खान्देशना करता व अहिरानी साहित्यिकस्ना करता शुभ संकेत सेतस.

आपली भाषाले प्रमाणभाषाना दर्जा भेटानी हाई नांदीज से.

आज खरी गरज जर कोन्ती व्हई ते साहित्यिकस्नी.त्याज आपला साहित्याना मार्फत आपला व्यथा!समस्या मांडथीन.

सामाजिक संघर्षाले साहित्य संस्कृतीज वाचाडु शकस.

ईतलं महत्व या संमेलननं से.

well began is half done नुसार हाई संमेलन थाटमाटमा वाजतगाजत सुखरुप पार पडीज.

यामा शंकाज नही.तरीबी नियोजनमा काही त्रुटी राहवो नही म्हणीन जेठा भाऊ म्हनीसन काही गोष्टी सांगनं जरुर से.

देखा भो या गरीबना तेवढाच हातभार नं समाधान आमले भेटीन.

गया ४/५ वरीसफाईन माय अहिरानीनी मनोभावे सेवा करीज रायनुत.त्या अनुभव सेतसज.

कोन्तं बी कार (कार्य) पार पाडतांना काय पापड बेलना पडतस,कितलं कष्ट करनं पडस,कितला मने समायना पडतस,कितला खर्च करना पडस हाई गोट,

जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे.

मंडई,भल्ती तारवरनी कसरत र्‍हास.

ती पार करत हाई संमेलननं आयोजन व्हयेल से.

त्याकरता बठ्ठा मायबाप आहिरानीना लेकरेस्नी याले यशस्वी करवा करता हातभार लाववो अशी रावनाई से.

एकते आपीन एराएरना पाय व्हढामा माहीर सेतस.

जराखा कोठे कोनी मव्हरे ग्या ते त्याले खाली खेचाना प्रकार देखाले भेटस.

तसं न करता एराएरले हात देत राहुत.

त्याना करता काही रास्त अपेक्षा आमना सारखा वयमा जेठामोठा करतस.

दहा आयवजी नऊज खुश व्हयनात ते चाली पन कोनीबी एक नाराज व्हता कामा नको.

तसं बठ्ठास्ले खुश करनारा अजुन जनमना नही आसं म्हनतस,ते बरोबरच से.

बठ्ठासले खुश करता येस नही.कोनीना कोनी नाराज र्‍हासच.पण फिकीर करो नही.

हाई माय आहिरानीनी पवित्र पालखी से.हिले सर्वास्ना खांदा बी लागना जोईजे नि समदास्ले मान सन्मानबी भेटाले जोईजे.

नही ते काय व्हस,

मिरनारा मिरतस,काम करनारा करतस,घाम गायनारा गायतस नि शाईनिंग मारनारा मव्हरे मव्हरे दिखस.

आस्सल सोनं कोपरमा नि बेनटेक्स शो केसमा.

एकादा ले जमत नही,एकादाले जमी जास.

तेवढं फक्त आपले देखनं से.

कोनताबी गट नको तट नको.

फक्त माय आहीरानीना जागर परचार व परसार हाईज ध्येय से.

मन्ही भोईभाई माय असा बारा जननी माय नि खाटले जीव जाय असी तिन्ही अवस्था नही व्हवाले जोईजे.

आम्ही बी २००७ ना आसपास वघाडी ता शिरपुर ले भव्य ग्रामीन आहीरानी संमेलन लिंथं.

पन ते बठ्ठाजन ईसरी ग्यात.

रातदिन मेहनत लिसन आम्ही ते पार पाडं व्हतं.पन त्याना कोठेज नाव नही.

आमले काही राग लोभ नही.तकरार नही नि कोनले दोसबी देतस नही.पन कार्य करनार दुखाई जास.नही म्हनं तरी हावु मानोस सभाव से.

खान्देशी मानोसले पैसा आडका नको पन मान सन्मानना भुख्या र्‍हास तो.

गुलाबनं फुलवर बी तो खुस व्हई जास अशी समाधानी मननी महान संस्कृती हाई फक्त अहिरानी खांदेशीज संस्कृती से.

तिना आपीन पाइक सेतस.

तयमय थीन हाई फुलावनी से.

संमेलन व्हई गे म्हनजे बस्स.आसं नको.

कायम तिना करता आपले झटनं से.

खरं कार्य करनारा मांगे नि दुसराज मव्हरे आसं नको.

सतरंज्या उचलनार ले बी यथायोग्य मान भेटाले जोईजे.

आपला आयोजकस्ले दांडगा अनुभव से.बारीक सारीक माहीती से.त्या बरोबर करथीनज पन त्यास्ले साथ देवानं आपलं बठ्ठासनं काम से.

घडीभर सोयताले ईसरीसन झोकी देवाले जोइजे.

काड्या कोरा पेक्षा काम कराले जोइजे.

रुसवा फुगवा बाजुले ठेवाले जोईजे.

आम्ही बठ्ठासवर प्रेम करतस.

सर्वसमावेशक सेतस.बठ्ठास्ले जोडाना प्रयत्न करतस पन

मंग याले वाटस त्याना से,

त्याले वाटस याना से.

मंग आमनी अवस्था ना घरका ना घाटका.

बठ्ठासवर प्रेम करनारनी जर अशी अवस्था व्हई ते काय कामनं.

कात्री पेक्षा सुई महत्वानी.

जी धागा धागा जोडस.

तसज हाई सार्वजनिक कामले बठ्ठास्नी हातभार लाववो.हाई संमेलन यशस्वी करो हाईज रावनाई से..

ज्याले जे बी जमस,त्यानी ते करो.

कोणी तन देवो,कोनी मन देवो,कोनी धन देवो.तर हाई पार पडी.

आम्ही जेठा मोठा आते पवु सकनार नहीत,पन पयनारस्ले हिंमत दिसुत.

करनारस्ले सुचाडत र्‍हातुस.

आपीन आपली भाषानी समृध्दी जगले दावानी से.

त्यासाठी दर्जेदार,कसदार,कायना कसोटीमा ऊतरनारं साहीत्य आपले तयार करनं से.

त्यामा द्वयर्थी शब्द्,बास्कट ईनोद,गाया सिया टाकना नही.

त्यामुये ते भाषानं हीडीस रुप जगना म्व्हरे नको जोईजे.

आपीन जर गावंढळपणा करत रायनूत ते जी समृध्दता,दर्जेदारपना कथा जाई.

म्हणीन आस्सल कलास्ले,लिखानस्ले,सादरीकरनले आपीन जोयनार सेतस,

यामा हावु नाराज व्हई,त्याले लेनजपडी असा दडपनै येवाले नही जोईजेत.बठ्ठास्नी कंबर कसीसन भाग लिवुत नि संमेलन भारी बनाडुत.

आम्ही जेठा मोठा तुमले मव्हरे पयाडसुत.आम्ही जुनी संस्कृती,भाषा,रुढी,परंपरा देगेल से.अनूभवेल से.खरी धरोहर आम्ही सेतस.आमनी कायपात ती माहीती नवीन पिढीपर्यंत पवचाडानी से.

ती गोड करी ल्या.

धल्लास्ले टरंगदोध्या समजु नका.काय वटवट लाई रायनात आसं बोलु नका.त्यासानाफाईन आयकासारखं,सिकासारखं गंजकच र्‍हास.ते शिकी ल्या,जित्त ईद्यापीठ सेतस त्या.

त्या जरी लामैन लायथीन,कटकट करथीन तरी ती भारीज से,

त्याना करता ऐक गोट सांगस,

खरी खरी घडेल गोट से.

एकदिन आमनी पुणे गाडीले डरायवर नही व्हता,

प्रवासी तकतक करी रायंतात,ऊंढाया दिन.

बालबच्चा तरमई र्‍हायंतात.

तवय मी रिटायरमेंट ले येयेल डरावरलै रावन्या पावन्या करी गाडीवर बठाडं.

मी बी त्यानी हिंमतनी करता बाजुमा

बठनु.

बसना मव्हरे टरक् चाली र्‍हायंता.

यानी भोंगा /हार्न वाजाडा.

तसा त्या टरक वालानी साईड दिनी.आनी मव्हरे काढी ले भो आसा ईसारा बी दिधा.

तरी हावु जुवान बस मवरे काढे नही.नि जोरजोरमा भोंगा वाजे.

आसं ३/४ पाये व्हयनं.

मी वैतागनु.

कारे भो,काढना रे मव्हरे.

तवय तो बोलना,

दखा बापु मी से धल्ला मनी गाडी से धल्ली...

मना बाप जमानामा मी मव्हरे पयाव नही.ओवर टेक कराव नही,.

मंग मी बी सांगं.

बरं भो नको पवु,पण घडी घडी हावु हाॅर्न नि भोंगा काब्र वाजाडी र्‍हायना?

तवय त्यानी भारी ऊत्तर दिन्हं,

"आहो भोंगा वाजाडी वाजाडी त्याले पुढे पयाडो नि मांगेथीन आपीन बी पयौ"

ओ तेनी बै,.आसं सेका भो..

माले त्यानं ऊत्तर पटनं.

आमी बी आते धरडपणे नवीन पिढीले आसज मव्हरे जावाना करता भोंगा वाजाडी रायनुत.

दवंडी पिटानं काम करी रायनुत.

नवीन पिढीले मार्ग दावानं काम करी रायनुत.त्याना राग मानु नका गड्याहोन.

दवंडी हाई सुध्दा आपला खान्देशनी जुनी परंपरा से.

ती नवीन पिढीले सांगाले जोईजे.

या चकाचक दुन्यामा ती मांंगे पडी गयी म्हणीन सांगी रायनु.

आयका हो मंडई आयकाऽऽ



गाजाडा गाजाडा गाजाडा

आहीरानी बोल तुम्ही गाजाडा

वाजाडा वाजाडा वाजाडा

मायना ढोल तुम्ही वाजाडा

         ===©Mkb

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय - कवी पी पी पाटील

आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी

अमयनेर संमेलन नी कहा गोट

राज्यस्तरीय अहिरानी युवा कवी संमेलन नाशिक