अहिराणी लोकगीतांतील संस्कृती ठेवा समृद्ध - प्रा रमेश धनगर यांचे प्रतिपाद
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे मराठी भाषा विभाग तथा भाषा प्रशाळा व संशोधन केंद्राच्या वतीने जागतिक बोलीभाषा दिनानिमित्ताने परिसंवादाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मराठी भाषा विभाग प्रमुख तथा भाषा प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्रा डॉ म सु पगारे हे होते. एसएसव्हीपीएस कॉलेज धुळे येथील प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी व जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड येथील बोलीभाषा अभ्यासक रमेश धनगर यांनी परिसंवादात सहभाग घेतला. यावेळी बोलीभाषेतील गमती जमती काय आहेत व अहिराणी संवर्धनासाठी सर्वांनीच योगदान देणे गरजेचे आहे असे डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी मत मांडले. तर भडगाव येथील रमेश धनगर यांनी अहिराणी बोली भाषा कशी प्राचीन आहे याचे दाखले दिले. अहिराणी लोकगीतातील संस्कृतीचा ठेवा समृद्ध आहे. अहिराणी लोकगीतातील व्यक्तिरेखांचाही तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास आणि संशोधन होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. डॉ म सु पगारे यांनी अहिराणी भाषा ही स्वतंत्र भाषा आहे. बोली ला स्वतंत्र अस्तित्व आणि अस्मिता असते असेही त्यांनी सांगितले. यावेळी भित्तीपत्रकाचं प्रकाशन झाले. विद्यार्थ्यांनी आदिवासी पावरा नृत्य सादर केले. सुशिला पावरा अनुष्का पावरा, विनोद पावरा आकाश कोंगळे, विशाल वळवी कविता बोरसे हिने अहिराणीत सुत्रसंचलन केले. यशस्वीतेसाठी प्रा बाळासाहेब सुर्यवंशी, डॉ उज्वला लांडगे, प्रा महेश सूर्यवंशी, आदींनी परिश्रम घेतले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा